|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या

काँग्रेस प्रवक्ते महादेव शेलार यांची आत्महत्या 

ऑनलाईन टीम / मुंबई :

काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. शेलार हे मुंबईतील मुलुंडमधील एलबीएस मार्गावरील बिलवा कुंज या इमारतीत वास्तव्यास होते. शेलार यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

त्यांनी गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना फोर्टिस रूग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शेलार व्यवसायाने वकील होते. शांत स्वभाव आणि अभ्यासू म्हणून ते प्रसिद्ध होते. काँग्रेसची सत्ता असताना पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडणारे नेते अशी महादेव शेलार यांची ओळख होती. अनेक वृत्तवाहिनीवरील चर्चांमध्येही त्यांनी बऱ्याचदा सहभाग नोंदवला होता. दरम्यान, शेलार यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रूग्णालयात पाठवण्यात आला आहे.

Related posts: