|Thursday, April 18, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पाकने उचलला मोठा फायदा

पाकने उचलला मोठा फायदा 

योग्य नात्याची आता सुरुवात

वॉशिंग्टन

 पाकिस्तानने अनेक वर्षांपर्यंत आमच्याकडून मदत घेतली, परंतु खऱया अर्थाने संबंधांची सुरुवात आता झाल्याचे वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. पाकिस्तानने हक्कानी नेटवर्कच्या तावडीतून अमेरिक-कॅनेडियन कुटुंबाची गुरुवारी सुटका केली, या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे वक्तव्य दोन्ही देशांच्या संबंधातील तणाव कायम असल्याचे दर्शविणारे आहे.

पाकिस्तान आणि त्याच्या नेत्यांसोबत चांगल्या संबंधांची सुरुवात झाली. अनेक मुद्यांवर सहकार्य देण्यासाठी त्यांचे आभार मानतो. दहशतवाद विरोधातील लढाईत पाकने अत्यंत अवघड समयी साथ दिली असा ट्विट त्यांनी केला.पाकने दहशतवादविरोधी लढाईत सकारात्मक उत्तर दिले. तेथील सैन्याने 5 वर्षे ओलीस राहिलेल्या अमेरिकन-कॅनेडियन कुटुंबाची सुटका करण्यास मदत केल्याचे उपराष्ट्राध्यक्ष माइक पेन्स यांनी म्हटले. कॅटलन आणि जोशुआ यांचे 2012 मध्ये अफगाणमध्ये अपहरण झाले. ओलीस ठेवण्यात आले असतानाच त्यांच्या 3 मुलांचा जन्म झाला. 12 ऑगस्ट रोजी अमेरिकेच्या माहितीच्या मदतीने पाकिस्तानच्या दलाने या पाचही जणांची दहशतवाद्यांच्या कब्जातून सुटका केली. सुटकेनंतर बोलताना जोशुआ याने पत्नीवर दहशतवाद्यांनी बलात्कार केल्याचा आणि मुलीला ठार मारल्याची माहिती दिली.दहशतवादी गटांना आश्रय देण्यावरून ट्रम्प यांनी पाकला अनेकदा फटकारले. अफगाण आणि दक्षिण आशियाविषयक धोरणात बदल केला नाही तर परिणाम भोगावे लागतील असा इशारा ट्रम्प यांनी पाकला दिला.

Related posts: