|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » चिखलगांव सरपंचांसह सर्व सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश

चिखलगांव सरपंचांसह सर्व सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश 

वार्ताहर/ राजापूर

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना चिखलगाव परिसरात शिवसेनेने काँग्रेसला जोरदार झटका दिला आहे. चिखलगाव सरपंच व युवक कॉग्रेस उपाध्यक्ष योगेश नकाशे यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. 

राजापूर तालुक्यात शिवसेनेमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ओणी ग्रामपंचायत सदस्या अस्मिता पवार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी सेनेत प्रवेश केलेला असताना आता चिखलगाव ग्रामपंचायत सरपंचासह सर्व सदस्यांनी सेनेचा भगवा झेंडा हाती घेतला आहे. यामध्ये सरपंच योगेश नकाशे यांच्यासह उपसरपंच सौ.अक्षता कुडकर, सदस्य सौ.शर्मिला सुर्वे, सौ.कांचन नकाशे, सुनील पळसमकर, सौ.अनिता ठीक, तसेच माजी उपसरपंच शिवाजी सुर्वे, कृष्णकांत नकाशे, किशोर निखार्गे, जयराम जडय़ार, सहदेव जडयार, रामचंद्र जडयार, अनंत ठीक, सुभाष बापेरकर, राजाराम नकाशे, अनिल कोरगावकर, संतोष केसरकर, बापू सोष्ठे, आबा निखार्गे, प्रेमा जडयार, राजाराम कांबळे, अश्विनी ठीक, बावा कुडकर, भिकाजी कुडकर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.

या प्रवेशाप्रसंगी आमदार राजनजी साळवी, माजी आमदार गणपत कदम, राजापूर तालुका संपर्क प्रमुख चंद्रप्रकाश (बबन) नकाशे, उप जिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख प्रकाश कुवळेकर, सभापती सुभाष गुरव, महिला आघाडी योगिता साळवी, उप तालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, तात्या सरवणकर, राजेंद्र कुवळेकर, विभागप्रमुख वसंत जडयार, संतोष हातणकर, युवासेना तालुकाअधिकारी प्रफुल्ल लांजेकर, जिल्हा परिषद सदस्य सोनम बावकर, सुहास तावडे, उप विभागप्रमूख विवेक मांडवकर व अन्य मान्यवर उपस्थित होते

Related posts: