|Monday, January 21, 2019
You are here: Home » Top News » डोक्यात कोयत्याने वार करून डेअरी व्यावसायिकाची हत्या

डोक्यात कोयत्याने वार करून डेअरी व्यावसायिकाची हत्या 

ऑनलाईन टीम / पुणे :

पुण्यातील कात्रज भागामध्ये बाळासाहेब पाटील नावाच्या एका दुधव्यावसायिकाची कोयत्याने 17 वार करून निघुर्णपणे हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कुणाल रणदिवे आणि सागर गिरी यांना अटक केली आहे. हत्या करण्यापूर्वी आपण बाळासाहेब पाटील यांना अटक केली आहे. हत्या करण्यापूर्वी आपण बाळासाहब पाटील यांना दारू पाजली आणि मग त्यांची हत्या केली अशी कबुली रणदिवे याने दिली आहे. पैशाच्या वादातून ही हत्या झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.

दुग्धजन्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱया रणदिवेकडून बाळासाहेब पाटील यांनी काही पैसे उधार घेतले होते. ते पैसे देण्यास पाटील टाळाटाळ करत होते. यामुळे संतापलेल्या रणदिवे पाटील यांना सपवण्याचा कट रचला. त्याने रविवारी रात्री दारू पिऊ असे म्हणून बाळासाहेब पाटील यांना बोलावले. पाटील यांनी दारू प्यायल्याने ते झिंगले होते,याचा फायदा उचलत कुणाल आणि त्याचा सहकारी सागर याने कोयत्याने वार करत पाटील यांची हत्या केली.

 

Related posts: