|Thursday, October 18, 2018
You are here: Home » leadingnews » राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शाह-फडणवीस यांच्यात चर्चा ?

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शाह-फडणवीस यांच्यात चर्चा ? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या उभय नेत्यांमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. त्यानंतर सोमवारी झालेलया या दोन्ही नेत्यांमधील बैठकीत काय निर्णय झाला याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आपला स्वतःचा पक्ष काढून राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये नुकतेच सामील झालेले ‘महाराष्ट्र स्वाभिमान’चे अध्यक्ष नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेशाबाबतही चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री रविवारी अहमदाबादमध्ये असताना त्यांनी अमित शाहांची भेट घेऊन मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, नारायण राणेंना राज्य मंत्रिमंडळात स्थान द्यायचे का, दिल्यास त्यांना कोणते खाते द्यायचे, असे महत्वपूर्ण प्रश्न मुख्यमंत्र्यांसमोर आहेत.

Related posts: