|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱयांना कर्जमाफी प्रमाणपत्र

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी शेतकऱयांना कर्जमाफी प्रमाणपत्र 

18 ऑक्टोबरला वितरण

50 शेतकऱयांना प्रातिनिधीक वाटप

पालकमंत्र्यांची उपस्थितीती

निवासी उपजिल्हाधिकारी घोरपडे यांची माहिती

प्रतिनिधी /रत्नागिरी

रत्नागिरीतील शेतकऱयांची दिवाळी यंदा गोड होणार आहे. अभ्यंगस्नाना दिवशी जिल्हय़ातील पात्र शेतकरी लाभार्थ्यांना कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहे. 18 ऑक्टोबरला प्रातिनिधीक स्वरूपात 50 शेतकऱयांना पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्याहस्ते या प्रमाणपत्राचे वितरण हेणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना दिली.

महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱयांसाठी कर्जमाफीचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी पात्र शेतकऱयांकडून ऑनलाईन कर्जमाफी अर्ज भरून घेण्यात आले आहेत. आता याबाबतची लाभार्थ्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू असून शेतकऱयांचा दिवाळीचा आनंद गोड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रत्येक जिल्हय़ात त्यासाठी विशेष कार्यकमाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात 18 ऑक्टोबर रोजी कर्जमाफी प्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्र्यांचे हस्ते होणार आहे.

पहिल्या टप्प्यात 50 शेतकऱयांना कर्जमाफी प्रमाणपत्र प्रातिनिधीक स्वरूपात देण्यात येणार आहे. उर्वरीत लाभार्थ्यांना हे कर्जमाफी प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जमाफी निकषानुसार हा लाभ पात्र शेतकऱयांना लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येणार असल्याचे अभिजीत घोरपडे यांनी सांगितले.

त्यामुळे यंदाची दिवाळी कोकणातील शेतकऱयांसाठी मोठी भेट ठरणार आहे. शेतकऱयांना हे प्रमाणपत्र वैयक्तीक स्वरूपात न देता हा आनंदाचा क्षण सर्वांच्या उपस्थितीत साजरा केला जाणार आहे. शासकीय सुट्टी असतानाही प्रशासनाने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यासाठी स्वतः जिल्हाधिकारी प्रदीप पी. यांच्यासह त्यांची संपूर्ण टीम नियोजनबध्द काम करीत आहे.