|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मुलगा नदीत बुडाला

मुलगा नदीत बुडाला 

प्रतिनिधी/ सांगली

शहरातील नवीन वसाहत येथील वैभव शरद कांबळे वय 14 हा सोमवारी दुपारी किल्ल्यासाठी माती आणण्यास गेला असता कृष्णानदीत बुडाला. याबाबतची नेंद शहर पोलीसांत झाली आहे. मनपाच्या अग्निशमन दलाच्या पथकाने दिवसभर नदीच्या पाण्यात उतरून शोधाशोध केली मात्र तो सापडला नाही. दरम्यान,  बाजूला दिवाळी सणाची धूम सुरू असताना मुलगा नदीत बुडाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 सोमवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास शहरातील राजर्षी शाहू कॉलनी नवीन वसाहत येथील वैभव कांबळे याच्यास त्याचे अन्य दोघे मित्र किल्ल्यासाठी कृष्णा नदीवरील स्वामी समर्थ घाटाजवळून नदीत उतरले. या तिघांनाही पोहता येत होते मात्र अचानकपणे वैभव हा पाण्याच्या दाबाने वाहत गेला आणि बघता बघता नदीच्या पात्रात बुडाला यानंतर त्याच्याबरोबर पोहणारे दोघे मित्र घाबरून पात्रातून बाहेर आले. त्यांनी तेथून नवीन वसाहत येथे जावून नातेवाईकांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकासह अन्य लोकांनी नदीत वैभवचा शोध सुरू केला मात्र त्यांना तो सापडला नाही. यानंतर मनपाच्या अग्निशामन दलालाही बोलाविण्यात आले.

 अग्निशामन विभागाचे प्रमुख शिवाजीराव दुधाळ यांच्या नेतृत्वाखालील फायरमन विजय पवार, प्रसाद माने, चालक सतीश वाघमारे, रवींद्र भगत यांनीही नदीत वैभवचा शोध मोहीम सुरू केली. तीन चार तास शोधाशोध सुरू होती मात्र तो सापडला नाही. पावसाच्या पाण्याने नदीत पाणी वाढले आहे शिवाय गढूळही झाले असल्याने शोध मोहिमेत अडथळा आला असून मंगळवारी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, मुलगा नदीत बुडाल्याचे समजात कृष्णानदीच्या काटावर मोठय़ा संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.