|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

अपामार्जन उदकशांतीचे महत्त्व भाग तिसरा

बुध. दि. 18 ते 24 ऑक्टोबर 2017

उदकशांत केव्हा करावी, त्याचा मुहूर्त व त्याचे त्वरित फळ मिळण्यासाठी काय करावे. उदकशांत करण्याची इच्छा आहे पण आर्थिक क्षमता नाही. अशावेळी काय करावे असा प्रश्न अनेकांनी विचारलेला आहे. पूर्वीच्या काळी उदकशांत करा म्हटले की, घरात भितीचे वातावरण निर्माण होत असे हा विधी भयानक असतो अशी भितीही अनेकजण घालायचे. तसेच ही शांती करा म्हटले की, घरात कोण मृत झाले आहेत का असे लोक विचारत असत. लोक विचित्र नजरेने पाहत असत. यामागील उदकशांती कर्माबाबत त्यांचे अज्ञान हेच मुख्य कारण आहे. पंचमहाभूतांच्या सहकार्यानेच या जगाची निर्मिती झालेली आहे. कोणतेही महत्त्वाचे काम करताना अग्निचा वास योग्य ठिकाणी असेल तरच त्यात यश मिळते. ही पंचमहाभूते एकमेकांशी निगडीत आहेत. पृथ्वी तत्व व उदक तत्व ही दोन तत्वे उदीत असता केलेली कर्मे साध्य होतात. अग्नि वाहात असताना मृत्यू व वायू वहात असता क्षय  अशी कर्माची फळे मिळतात असे एका प्राचीन ग्रंथात दिलेले आहे व दैनंदिन व्यवहारातही त्याचा प्रत्यक्ष अनुभव येत असतो. ज्यावेळी अग्निचा वास पृथ्वीवर असतो. त्यावेळी उदकशांत केल्यास त्याचे चांगले फळ मिळते. त्यातही तिथीवार योग नक्षत्र शुभ असेल घरातील वातावरण स्वच्छ व आनंदी असेल तर या शांतीचे फळ कोटीच्या प्रमाणात मिळते.सर्व सामान्यांना या बाबी समजणार नाहीत. उदकशांती दिवसा रात्री केव्हाही करता येते. पण तरीही द्वादशीला भर दुपारी राहू काळात ही शांती केल्यास त्याचे त्वरित अनुभव येतात. कोणत्या वेळी ही शांती केली असता. काय फळ मिळते त्याचे विधी विधान वगैरे सर्व काही प्राचीन ग्रंथात आहे पण काळाच्या ओघात हे ग्रंथ उपलब्ध होत नाहीत व नको त्या व्यक्तीच्या हाती हे ग्रंथ पडल्यास त्याचा दुरुपयोग होण्याची शक्मयता असल्याने या शांतीविषयी कुणी स्पष्ट सांगत नाहीत. उदक शांतीचे मंत्र हे संस्कृतमध्ये आहेत. जिथे मराठी अथवा इतर भाषा स्पष्ट बोलता येत नाहीत तेथे संस्कृतचे  उच्चार काय जमणार असाही प्रश्न निर्माण होतो हल्लीच्या काळात कुणी तरी सांगितले म्हणून श्लोक व संस्कृत मंत्राचे पठण करतात. शांती वगैरे करतात पण त्याचा गुण येत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे चुकीचे मंत्रोच्चार हेच आहे. कोणतेही स्तोत्र अथवा मंत्र मूळ स्वरुपात  जसा आहे. तसाच  म्हटला तरच त्याचा अनुभव येतो बेळगावच्या एका प्राचीन मंदिरात रुद्राची आवर्तने चालू असताना  नमक चमक म्हणताना तथाकथित अमुक महाराज की जय तमुक महाराज की जय असे शब्द घातल्याचे दिसून आले हे महाराज हल्लीच्या भाषेत सर्वगुणसंपन्न होते. अशामुळे त्या मंत्रांचा अपमान होतो व मंदिरांचे पावित्र्यही धोक्मयात येते. त्यामुळे संस्कृतचे उच्चार माहीत नसतील तर ते मंत्र म्हणण्याच्या भानगडीत पडू नये ते उच्चार कसे आहेत ते शिकून घ्यावे उदकशांतीच्या मंत्रांचा उच्चारही अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने होत असल्याचे दिसून आले आहे. त्यांना याची जाणीव करून दिल्यास ते लोक मागाहून टीका करतात. विव्दजनानी याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. उच्चार स्वच्छ असतील तर सर्व तयारीसह साडेतीन चार तास सहज लागतात. पण वाघ मागे लागल्याप्रमाणे कसे तरी उरकायचे म्हणून ही शांती अर्ध्या तासात करणारेही आहेत. हे योग्य नाही. यजमानांनी भटजींचा योग्य तो मान ठेवणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शांती करणाऱयांनी भरमसाठ खर्च सांगू नये शांतीला जे साहित्य सांगितलेले असते त्यापैकी अर्ध्या साहित्याचा वापर होत नाही. असे लोक म्हणतात. दहा ठिकाणी वापरलेले साहित्यच वापरतात. देवाची पूजा अशा उष्टय़ा साहित्याने केल्यास चांगले फळ कसे मिळणार अशा तक्रारीही सतत ऐकू येतात. असे साहित्य वापरून पूजा अथवा शांती केल्यास त्याचे अनिष्ट परिणाम होतात.

 

मेष

आर्थिक खर्च वाढेल, तसेच उधार उसनवार यापासून शक्यतो दूर रहा. प्रवासाचे बेत आखाल. पण प्रवासात महत्त्वाच्या वस्तुंची काळजी घ्यावी लागेल. जागा जमीन, जुमला, वाहन खरेदी करताना कागदपत्रे नीट तपासून घ्या. प्रेम प्रकरणात जास्त गुंतू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे नीट लक्ष द्यावे. चंचलपणा कमी करावा. आरोग्याच्या बाबतीत पायांची काळजी घ्यावी.सर्दी व कफ यांचा त्रास जाणवेल.


वृषभ

अवघड कामे हळूहळू मार्गी लागतील. घरामध्ये नवीन काहीतरी बदल किंवा नूतनीकरण करावेसे वाटेल. वरि÷ अधिकाऱयांच्या ओळखीमुळे महत्त्वाच्या कामाला गती मिळेल. ओढाताण, दगदग यामुळे खाण्यापिण्याच्या वेळा बदलतील. त्यामुळे आरोग्यावर परिणाम होऊ लागेल. उष्णतेचे व डोळय़ांचे त्रास उद्भवतील. कोणावरही अतिविश्वास ठेऊ नका. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद टाळा.


मिथुन

मनामध्ये नवनवीन योजना आखत असाल तर ते स्वप्न पूर्ण होईल. कुटुंबात वादविवाद, भांडण,तंटे वाढू देऊ नका. लोकांची काही महत्त्वाचे कामे घेत असाल तर ती जबाबदारीने पार पाडा. काटकसर व बचत यांचा ताळमेळ जुळवून आणा. घरातील एखाद्या कुटुंबातील व्यक्तिसाठी त्याच्या आजारपणासाठी पैसा खर्च करावा लागेल. पै पाहुण्यांची घरी वर्दळ वाढेल. आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या.


कर्क

भागिदारी व्यवसाय करताना काळजीपूर्वक करा. संततीविषयक काळजी व चिंता वाटू लागेल. आरोग्याच्या बाबतीत गुडघेदुखी, कंबरदुखी यांचा त्रास जाणवेल. त्यासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरी व्यवसायात मनासारखे यश मिळेल. आर्थिक आवक वाढेल. अफवांवर विश्वास ठेऊ नका. नोकरीत वरि÷ अधिकाऱयांशी वादविवाद घालू नका. वडिलोपार्जित इस्टेटीची वाटणी होऊन त्यात आर्थिक लाभ होईल.


सिंह

सतत काही ना काही आजार डोके वर काढत राहिल. पाण्यापासून उदभवणारे आजार आपणास त्रासदायक ठरतील. विवाह करताना थोरामोठय़ांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या. अन्यथा फसगत होऊ शकते. परदेश प्रवासाच्या संधी येतील. नवीन वाहन खरेदी करण्यास उत्तम काळ आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहण्यासाठी पूर्वेकडे तोंड करून कोणतीही घाण करू नका.  नोकरीत बदली बढतीचे योग येतील.


कन्या

या सप्ताहात आनंदाची बातमी ऐकावयास मिळेल. आर्थिक व्यवहार करताना मनाचा गोंधळ निर्माण करू नका. जमिन, स्थावर मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रे नीट हाताळून घ्या. तुम्ही एखादे चांगले कर्म केले असेल तर त्याचे फळ नक्कीच चांगले मिळेल. एखादी नवीन जबाबदारी आपणास स्विकारावी लागेल. भागिदारी व्यवसायात शंकेचे वातावरण निर्माण होईल. कामाची दगदग कमी होईल.


तुळ

अचानक विवाहाची बोलणी फिसकटण्याची शक्मयता. प्रेमप्रकरणात म्हणावे तसे यश मिळणार नाही. प्रवासी कंपन्या व ब्रँडेड कपडे तसेच महिलांना आवडणाऱया वस्तू या व्यवसायात प्रगती साधू शकाल. सध्या राहत्या वास्तूत काही बदल केला असाल तर मन समाधानी राहील. समजूतदारीने काही कामे करून घ्यावीत. नोकरी व्यवसायाच्या संधी आपणास आपणहून चालून येतील. खर्च वाढत राहिला तरी कोठून ना कोठून आवकही वाढत राहील.


वृश्चिक

एखादी महत्त्वाची योजना आखत असाल तर कुटुंबाच्या सल्ल्याने घ्या. त्यांचा आपल्याला हातभार मोलाचा वाटेल. जमिन जुमला खरेदीचा योग येईल. त्यानंतर त्याची विक्री केल्यास त्यात मोठा नफा होईल. प्रेमप्रकरणांना थारा देऊ नका. आपण आपला चंचलपणा व आपली मनोवृत्ती बदलल्यास आयुष्यात बरेच काही चांगल्या गोष्टी साध्य करू शकाल. कुटुंबात लहान सहान वादविवादातून त्याचे मोठे वादळ निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.


धनु

सतत प्रवासाचे योग येतील. स्थावर अथवा वाहन खरेदी करताना आपल्या आर्थिक बजेटकडे लक्ष देऊन मगच विचार करा. प्रवासात जास्त ओळखी वाढवू नका. भागिदारी व्यवसाय करताना नीट कागदपत्रे वाचल्याशिवाय सहय़ा करू नका. स्वत:च्या लहरी स्वभावामुळे काही वेळा मन:स्ताप वाढेल व त्याचा नोकरी व्यवसायावर परिणाम होईल. रागावर व स्वत:च्या उद्धट बोलण्यावर संयम ठेवा.


मकर

दुसऱयांचे भले झाले म्हणून स्वत: आतून दु:खी होऊ नका किंवा दुसऱयांचे वाईट झाले म्हणूनही आनंदी होऊ नका. अन्यथा उलट प्रचितीही आपणास आढळून येईल. यासाठी आपल्या हाताने जेवढे शक्मय होईल तेवढे भले करा. थोडय़ाच दिवसात आपल्या जीवनात प्रगतीचे वारे खेळू लागेल. घरात एखादे मंगलकार्य अथवा पूजा पाठ करवून घ्या. समुद्रदेवतेची उपासना करा.


कुंभ

आपली बाजू बरोबर असली तरी इतरांना ते पटणे फार कठीण असते याचा अनुभव या आठवडय़ात येईल. मानसिक ओढाताणीत नोकरी व्यवसाय जपावा लागेल. गुरु कृपेमुळे आर्थिक चणचण भासणार नाही. कामास विलंब झाल्यामुळे काही महत्त्वाच्या संधी हातून जाऊ शकतात. प्रेमप्रकरणात जपून रहा.


मीन

कोणतेही काम करताना वैवाहिक जोडीदाराला विश्वासात घेऊन केलेलेच चांगले. अनपेक्षित आर्थिक लाभ आणि वाहन खरेदीचे योग. नोकरीत स्थलांतर अथवा बढतीची शक्मयता. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय दुसरी जबाबदारी स्वीकारू नका. व्यावसायिक प्रगतीसाठी थोरामोठय़ांचे सहाय्य घ्यावे लागेल.