|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » तमसो मा ज्योतिर्गमय

तमसो मा ज्योतिर्गमय 

दिवाळी दरवषी दिव्यांचा नुसता उजेड आणीत नाही. त्या उजेडात काहीतरी नवी गोष्ट दाखवते. पण आपण ती गोष्ट बघायला हवी आणि बघितल्यावर त्यातून काही शिकायला हवं.

पन्नासेक वर्षांपूर्वी महाराष्ट्रातल्या अनेक शहरात अचानक एक अफवा पसरत असे. रात्री एक हडळ येते आणि शहरभर फिरते. लोकांची दारे ठोठावते आणि दारावरची पाटी वाचून हाक मारते. तिच्या हाकेला ओ दिल्यावर ओ देणारा माणूस तत्काळ गतप्राण होतो. या हडळीला ‘हाकामारी’ असे म्हणत. काळाच्या ओघात हाकामारी गायब झाली. लोकांनी बहुमजली इमारती बांधल्याने, तळमजल्यावर फक्त पार्किंग असल्याने हाकामारीला वरच्या मजल्यावर जायचा कंटाळा आला असेल!    

वीसेक वर्षांपूर्वी मुंबईत एक अफवा उठली की देशभर गणपतीच्या मूर्ती दूध पिऊ लागल्या आहेत. मी तेव्हा नोकरीत होतो आणि सांताक्रूझ इथल्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणार्थी होतो. संध्याकाळी फिरायला जाताना आमच्या टेनिंग सेंटरसमोर (स्वामी विवेकानंद रस्त्यावर) एका अगदी छोटय़ा गणेश मंदिरासमोर भली मोठी रांग दिसली. लोक हातात छोटी दुधाची भांडी आणि चमचे घेऊन रांगेत उभे होते. व्यवस्थापक प्रत्येकाकडून एक रुपया घेऊन दुधाचा चमचा सोंडेला तिरका लावीत होता. पृ÷ाrय ताणामुळे दूध ओघळून जात होते आणि मूर्ती दूध प्राशन करते असा भास होत होता. तेव्हा सोशल मीडिया नसून देखील ही अफवा देशाच्या कानाकोपऱयात पसरून मीडियाला जबरदस्त टीआरपी देऊन गेली होती.

यंदा उत्तरेकडील प्रांतांमध्ये नवीन अफवा उदयाला आली आहे. कोणीतरी गूढ शक्तीने बेडरूममध्ये येतो.  तरुणींना जादूने बेशुद्ध करतो आणि त्यांचे केस कापून ‘वेणीसंहार’ करतो. काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी असे करणाऱया माणसाला पकडणाऱया व्यक्तीला सहा लाखांचे इनाम जाहीर केले आहे. रात्रभर सर्वत्र पोलीस खाते गस्त घालीत आहे. पण तो जादूगार काही सापडला नाही. मात्र या काळात उत्तम कुलपे, इलेक्ट्रॉनिक सुरक्षा यंत्रणा, सीसीटीव्ही विकणाऱयांचा धंदा भरभराटीला आला आहे. त्यामुळे देशाच्या जीएसटीमध्ये नक्कीच भर पडली असावी! आणि इलेक्ट्रॉनिक सुरक्षा व्यवस्था कितीही भक्कम केली तरी बेडरूममध्ये सीसीटीव्ही लावणे शक्मय नसल्याने चोर कसा सापडणार.

दिवाळीत आपण घरोघर तेलाचे दिवे लावतो. त्या प्रकाशात डोळसपणे खरेखोटे बघण्याची आणि ओळखण्याची शक्ती दिवाळी आपल्याला देवो आणि अंधश्रद्धेपासून आपल्याला सर्वांना मुक्ती मिळो हीच देवाला प्रार्थना.

Related posts: