|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेस सरकारमुळे विकास वेडा झाला : मोदी

काँग्रेस सरकारमुळे विकास वेडा झाला : मोदी 

ऑनलाईन टीम / भावनगर :

विकासासाच्या मुद्यावरून भाजपाला सातत्याने लक्ष्य करणाऱया काँग्रेसवर रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. गुजरातचा मुख्यमंत्री असताना काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील यूपीए सरकारने विकास प्रकल्पांना जाणीवपूर्वक विरोध केला.त्यामुळे गुजरातचा विकास पूर्णपणे ठप्प झाला होता, अशी टीका मोदींनी केली.

गेल्या महिनाभरात मोदी तिसऱयांदा गुजरात दौऱयावर आले आहेत. यावेळी त्यांनी घोघा- दहेजदरम्यान ‘रो-रो फेरी’सेवेचा शुभारंभ केला. त्यानंतर भावनगरमधील जाहीर सभेत विकासाच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीकेचा भडीमार केला. मी मुख्यमंत्री असताना केंद्रातील काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकारने गुजरातचा विकास रोखण्यात कोणतीच कसर सोडली नाही, असा आरोप त्यांनी केला.

 

Related posts: