|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » मनोरंजन » मिथुन चक्रवर्ती यांचे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन

मिथुन चक्रवर्ती यांचे छोटय़ा पडद्यावर पुनरागमन 

झी टीव्ही, मागील 25 वर्षांपासून भारतातील सामान्य माणसाचे कौशल्य सादर करण्यात आणि खऱया अर्थाने त्यासाठी लायक असणाऱया व्यक्तींसाठी संधीचे जग खुले करण्यात अग्रभागी राहिला आहे. स्वत:च तयार केलेल्या नॉन-फिक्शन स्वरुपांच्या रिऍलिटी शोमध्ये डान्स इंडिया डान्सने नेहमीच एक सर्वोच्च स्थान मिळविले आहे. भारतीय टेलिव्हिजनवर डान्सला एक आदराचे स्थान मिळवून देण्यासाठी सर्वात पहिला मंच उपलब्ध करून देऊन डान्स इंडिया डान्सने भारतातील डान्समध्ये एक क्रांती आणली आहे आणि डान्स हा लाखो लोकांसाठी मुख्य प्रवाहातील करियरचा पर्याय बनवला आहे. या मंचावर काही दिमाखदार टॅलेंटची प्रत्येक सीझनला ओळख करून देण्यात आली आहे. जसे की धर्मेश, शक्ती मोहन, पुनित जे पाठक, सलमान युसुफ, राघव जुयाल किंवा प्रिन्स यातील प्रत्येकजणांनी स्वत:ची जागा निर्माण केली आहे आणि एंटरटेनमेंटच्या जगात स्वत:चे नाव कमावले आहे. डान्सिंग सेन्सेशनसह देशाला 5 सीझन दिल्यानंतर आता डान्स इंडिया डान्स सहाव्या सीझनसह परत येण्यासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी डान्स का असली आयडी या टॅगलाइनसह डान्स इंडिया डान्समध्ये देशभरातील उभरत्या टॅलेंटचे स्वागत केले जाणार आहे. ज्यांना कलेची आवड आहे त्यांना डान्सचा पराक्रम झी टीव्हीसारख्या सर्वोच्च मंचावर सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.

मिनी प्रधान, मार्झी आणि मुदस्सर सारखे परीक्षक शो मध्ये असताना, डान्स इंडिया डान्सचे सर्वात लाडके सदस्य, मिथुन चक्रवर्ती ऊर्फ मिथुनदा शोवर परत येणार आहेत. ओळीने सहाव्या सीझनचे ग्रँड मास्टर म्हणून. प्रख्यात डान्सर म्हणून मिथुनदांचे प्रेमळ व्यक्तिमत्व आणि डान्सविषयीची कळकळ यामुळे डान्स इंडिया डान्स हा टेलिव्हिजनवरील प्रिमियर शो बनला आहे. स्पर्धकांच्या आनंद आणि दु:खात मनापासून सहभागी होणाऱया या प्रख्यात अभिनेता आणि डान्सच्या गुरूपासून हा शो वेगळा करणे अवघड आहे. शोवर परत येण्याविषयी बोलताना ग्रँड मास्टर मिथुन चक्रवर्ती म्हणाले, ‘डान्स इंडिया डान्स हा माझ्या साठी फक्त शो नाही तो माझ्या जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे. या शोमध्ये दिसून आलेल्या प्रत्येक मोठय़ा टप्प्यामध्ये सहभागी झाल्यामुळे मी त्याच्याशी जबरदस्त भावनाशीलतेने जोडला गेलो आहे. या शोने अनेक महत्वाकांक्षी डान्सर दिले आहेत. अस्सल टॅलेंट असलेले, एक योग्य मंच दिला आहे त्यांची स्वप्ने सत्यात आणण्यासाठी आणि नशीब बदलणे स्वत:च्या हाती घेण्याची संधी दिली आहे. यावर्षी हा शो अजूनच विशेष साजरा केला जाणार आहे. कारण त्यात सोबत आहे झी टीव्हीचे 25 वे वर्ष साजरे करण्याचा महोत्सव आणि एकत्रितपणे आम्ही सर्व आशा करतो की डान्स इंडिया डान्समध्ये आवाहन केल्या गेलेल्या भावना आणि आवड प्रेक्षकांशी जोडल्या जातील आणि त्यांना त्यांची स्वप्ने खरी करण्यासाठी विनंती करतील. डान्स इंडिया डान्सचा हा सीझन, यु टय़ुब सेन्सेशन साहिल खट्टर आणि मराठी मुलगी अमफता खानविलकर यांनी होस्ट केला आहे. आणि सर्वोच्च डान्सचा खजिना भारतीय टेलिव्हिजनवर खात्रीने हिट जाणार आहे. प्रत्येक माहित असलेला आणि अजून शोधला जाणार आहे अशा डान्सच्या प्रकाराला एक आदर्श मंच मिळणार आहे. कारण डान्स इंडिया डान्स संपूर्ण देशभरातली दडलेल्या महत्वाकांक्षांना पंख देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Related posts: