|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सुट्टी संपल्याने महामार्गावर मेगाब्लॉक

सुट्टी संपल्याने महामार्गावर मेगाब्लॉक 

 

वार्ताहर/ कराड

दिवाळीची सुट्टी संपवून सोमवारी आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी कामावर हजर होण्यासाठी चाकरमानी पुणे-मंबईकडे परतू लागल्याने रविवारी कोल्हापूर-मुंबई लेनवर दिवसभर मेगाब्लॉक जाणवला. एकाच दिवशी हजारो वाहने पुणे-मुंबईच्या दिशेने निघाल्याने महामार्गावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तर कराड बसस्थानक व रेल्वेस्टेशनवरही दिवसभर प्रवाशांची गर्दी पहावयास मिळाली. महामार्ग पोलीस व वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाऱयांनी दिवसभर महामार्गावर थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला.

दिवाळी हा वर्षाचा मोठा सण असल्याने पुणे-मुंबई येथे नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्यास असलेला चाकरमानी दिवाळी सणासाठी आपापल्या गावी येतो. तर दिवाळीची सुट्टी संपली की परत आपापल्या कामाच्या ठिकाणी हजर होण्यासाठी परतत असतो. शनिवारी भाऊबिज झाल्यानंतर दिवाळीची सुट्टी संपवून रविवारी चाकरमानी पुणे-मुंबईकडे रवाना झाले. एकाच दिवशी हजारो वाहने पुणे-मुंबईच्या दिशेने निघाल्याने महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. मलकापूर ते कराड दरम्यानच्या महामार्गावरील वाहतूक जाम झाल्याने महामार्गावरील वाहने सेवारस्त्यावर आली. थोडय़ाच वेळात सेवा रस्त्यातही वाहतूक जाम झाली होती. त्याचवेळी मुंबई-कोल्हापूर बाजूची लेन मात्र ओस पडली होती.

रविवारी सकाळपासूनच महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने महामार्ग पोलीस व वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दिवसभर महामार्गावर थांबून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र एकाच दिवशी हजारो वाहने पुणे-मुंबईच्या दिशेने निघाल्याने दिवसभर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कराड बसस्थानक व रेल्वे स्टेशनवरही पुणे-मुंबईकडे जाणाऱया प्रवाशांची गर्दी पाहावयास मिळाली. एस. टी. प्रशासनाच्या वतीने रविवारी पुणे व मुंबईकडे जाण्यासाठी जादा बसेस सोडल्या होत्या.

Related posts: