|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » विविधा » 50हजारांच्या बँक व्यवहारांसाठी ओळखपत्र अनिवार्य

50हजारांच्या बँक व्यवहारांसाठी ओळखपत्र अनिवार्य 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

कोणत्याही बँकेतील किंवा वित्तयि संस्थेतील 50 हजार रूपये किंवा त्यापेक्षा अधिक रकमेच्या व्यवहारासाठी आता ओळखपत्र अनिवार्य असणार आहे. आर्थिक घोटोळे, बोगस नोटा यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाने याबद्दलची माहिती दिली आहे.

नव्या नियमांमुळे बँक किंवा अर्थिक संस्थांमधील कर्मचाऱयांना ग्राहकांचे ओळखपत्र तपासून त्याची नोंद ठेवणे आवश्यक असेल. याशिवाय मोठय़ा व्यवहाराची माहिती फायनन्शियल इंटलिजन्स युनिटला देणे बंधनकारक राहिल यासोबतच ग्राहकांना व्यवहार करताना त्यांचा आधार क्रमांकही बँकांना द्यावा लागेल. अर्थिक गैरव्यवहारा रोखण्यासाठी आणि काळा पैशाच्या निर्मितीला पायबंद घालण्यासाठी अर्थ मंत्रालयाकडून याबद्दलची अधिसुचना काढण्यात आली आहे.