|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दिवाळीच्या सुट्टया अन्..सहलीत वाढ

दिवाळीच्या सुट्टया अन्..सहलीत वाढ 

सर्व परिवारासह फिरण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटनस्थळी गर्दी

प्रतिनिधी/ सातारा

दिवाळीची सुट्टी म्हणजे फक्त आभ्यासाला व कामालाच आराम नाहीतर, फराळ आणि फटाके संपले कि सहलीचे नियोजन प्रत्येक घरात केले जाते. मग महाबळेश्वर, ठोसेघर, कास, धरणे अशा ठिकाणी फिरायला जातात. ही सुटटी आठवणीत रहावी म्हणून वेगवेगळया स्पॉटवर फोटो सेशन केले जाते. व आनंद व्दिगुणीत केला जातो.

सुटटी लागली, सुटटी लागली म्हणत नाचणारी लहान मुले असली तरी मला चार दिवस सुटटी असे जण तर सुटटी लागायच्या आधीच सहलीला जायचे नियोजन करतात. त्यानुसार ठिकाण, वेळ, राहण्याची सोय, खर्च, गाडी, सर्वांचे नियोजन केले जाते. आणि आपल्या आवडीच्या ठिकाणी जाण्यास सगळेजण सज्ज होतात. मग महाबळेश्वर, कास, ठोसेघर, पाचगणी, जिल्हयातील धरणावर जाऊन हिरवळ निसर्गाच्या सानिध्यसात फिरायला गर्दी होत आहे. तर काहीजण आपल्या गावाला पाहुण्यांच्या घरी जातात.

हा क्षण आयुष्यात पुन्हा लवकर येणार नाही म्हणून प्रत्येक क्षण आपल्या मोबाईलच्या पॅमेरामध्ये कैद करीत आहेत. हा क्षण आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही म्हणुन प्रत्येक क्षण आपल्या मोबाईलच्या पॅमेरात साठवूण ठेवत होते. आपल्या कुटूंबासहीत निसर्गाच्या सनिध्यात सुटटीचा आनंद लुटताना प्रत्येकाच्या मनावरचे कामाचे ओझे कमी झाल्याचे दिसुन येत आहे.

Related posts: