|Thursday, October 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हॅण्डबॉल स्पर्धेचे ना. पा. हायस्कूलकडे अजिंक्यपद

हॅण्डबॉल स्पर्धेचे ना. पा. हायस्कूलकडे अजिंक्यपद 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

येथील नागोजीराव पाटणकर हायस्कूलने अंतिम सामन्यात महावीर इंग्लिश स्कूलचा 3-0 गोलने पराभव करुन मनपास्तरीय शालेय 14 वर्षाखालील मुलींच्या हॅण्डबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळवला. हायस्कूलला अजिंक्यपदी विराजमान करण्यात मोलाचा वाटा उचललेल्या कर्णधार सिद्धी नलवडेने गोलची हॅटट्रीक नोंदवली. महाराष्ट्र हायस्कूलच्या मैदानावर हा सामना झाला. महापालिकेने स्पर्धेचे आयोजन केले होते.

   स्पर्धेच्या जेतेपदामुळे ना. पा. हायस्कूलच्या संघाची लोणंद (जि. सातारा) येथे होणाऱया विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघाला भीमराव नागोजीराव पाटणकर ट्रस्टचे चेअरमन बाळ पाटणकर, विश्वस्त एन. एल. ठाकूर, हायस्कूलचे पर्यवेक्षक एस. डी. पूजारी, मुख्याध्यापक एस. आर. गुरव, क्रीडा शिक्षक एन. एस. जाधव, प्रशिक्षक संदीप कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

——ö

विजयी ना. पा. हायस्कूलच्या संघातील मुलींची नावे : निशिगंधा कांबळे, महिमा सावंत, पौर्णिमा टिकारे, अस्मिता सातपुते, जान्हवी सावंत, प्रणाली सुतार, स्नेहल राणभरे, रसिका पाटील, ऋतुजा शिरसाट, वृषाली वैराट, तन्वी पाटील.

——ö

Related posts: