|Saturday, January 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » गौरवाडमध्ये भाऊबीजेला एकात्मतेचे दर्शन

गौरवाडमध्ये भाऊबीजेला एकात्मतेचे दर्शन 

प्रतिनिधी/ †िशरोळ

देशात सद्या एकीकडे धर्मांध शक्ती वाढत आहे. जाती जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचे काम काही घटकांकडून होत आहे. मात्र गौरवाड गावामध्ये भाऊबीज निमित्त अतिशय चांगल्या पद्धतीने कार्यक्रम घेऊन हिंदू माता भगिनी कडून मुस्लिम तरुणांनी औक्षण करून घेतले. गावातल्या सर्व स्त्रीया आपली बहीण मानून दोन्ही समाजाला एकत्र आणून बंधूभाव जपला आहे हे कौतुकास्पद आहे, असे मत राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केले.

गौरवाड (ता. शिरोळ) येथे भाऊबीज निमित्त हिंदू महिलांनी मुस्लिम बांधवाना औक्षण करून अनोख्या भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन अस्लम मुल्ला, बाबुराव चिंचवाडकर, मुनिर शेख यांनी केले होते. याप्रसंगी  राजेंद्र पाटील-यड्रावकर बोलत होते. स्वागत आण्णासो मळवाडे यांनी केले. प्रास्ताविक मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे राज्याध्यक्ष अस्लम मुल्ला यांनी केले.

यड्रावकर म्हणाले, गावात जातीय तेड निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र आज हिंदू-मुस्लिम बांधव एकत्रित भाऊबीज सण येथे साजरा करीत आहेत. अशा जातीय तेड ला खऱया अर्थाने छेद दिला आहे. या कार्यक्रमाचे आयोजक अस्लम मुल्ला, बाबुराव चिंचवाडकर मुनिर शेख यांचे कौतुक करतोय, असे सांगत दिवाळीच्या व भाऊबीजेच्या सर्वाना शुभेच्या दिल्या.

यावेळी मुस्लिम तरुणांनी भाऊबीजेची ओवाळणी म्हणून बहिणीला साडी, फराळ साहित्य दिले. भाऊबीज म्हणजे बहीण भाऊ एकमेकांचे रक्षण करणे. हा कार्यक्रम समाजात एकता एकोपा निर्माण करण्यासाठी आदर्शवत ठरणार असल्याचे पंचायत समिती सभापती मल्लाप्पा चौगुले, आदिनाथ अरबाळे यांनी मनोगतात व्यक्त केले. आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी मुस्लिम हक्क संघर्ष समिती राज्य उपाध्यक्ष अझर पटेल, जिल्हाध्यक्ष समीर पटेल, अनिल लोंढे, महंमद शफी पटेल, अण्णाप्पा मळवाडे, अविनाश केस्ते, सुरेश बने, तयबु टेलर यांच्यासह हिंदू-मुस्लिम समाज बांधव, महिला उपस्थित होत्या. आभार अस्लम मुल्ला यांनी मानले.

Related posts: