|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » जीवनविद्या मिशनतर्फे रविवारी साताऱयात समाजप्रबोधन महोत्सव

जीवनविद्या मिशनतर्फे रविवारी साताऱयात समाजप्रबोधन महोत्सव 

आनंद मेळाव्यानिमित्त भरत पिंगळे यांचे प्रवचन

प्रतिनिधी/ सातारा

जीवन विद्या मिशन, सातारा शाखेतर्फे सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या जयंतीनिमित्त रविवारी दि. 29 रोजी नामधारक व सद्शिष्यांचा आनंद मेळावा साताऱयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे  उपकार्यकारी अभियंता भरत पिंगळे यांचे ‘जीवनविद्या आनंदासाठी’ या विषयावर प्रवचन व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दि. 29 रोजी दुपारी 3 ते 6 यावेळेत न्यू राधिका रोडलगतच्या भोसले मळ्यातील श्री दत्त मंदिर परिसरात हा आनंद मेळावा होणार  आहे. या मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन जीवनविद्या मिशनचे शाखाध्यक्ष उत्तमराव भोसले, ग्रंथदिंडी समितीचे प्रमुख रवींद्र पोफळे यांनी केले आहे.   

 सन 1952 पासून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून सद्गुरु श्री वामनराव पै यांनी संपूर्ण समाजाच्या उद्धारासाठी प्रवचन, व्याख्यान, ग्रंथसंपदा आणि विविध सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक उपक्रमांच्या रुपाने व्यापक प्रमाणावर सत्कार्य केले आहे. त्यांच्या जयंती सप्ताह निमित्ताने होत असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related posts: