|Friday, February 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा 

प्रतिनिधी /कुरूंदवाड :

स्वर्गीय बाळासाहेब शहापूरे यांच्या अथक प्रयत्नातून या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाची संधी प्राप्त झाली. या संधीचे सोने करून गुणवत्ता वाढीबरोबर शाळेचा लौकीक वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली कर्तबगारी दाखवून दिली आहे. त्यामुळे येथील शिक्षण हे यशस्वी जीवनासाठी दिशादर्शक आहे, असे गौरवोद्गार माजी मुख्याध्यापक व शाळा सुवर्ण महोत्सवी समितीचे अध्यक्ष ए. टी. कबाडे यांनी व्यक्त केले.

कवठेगुंलद (ता. शिरोळ) येथील लालबहाद्दूर शास्त्री विद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी वर्षे सुरू आहे. यानिमित्त 1996 च्या 10 वीच्या बॅचच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश शहापूरे होते. सरस्वती प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.

स्वागत बाहुबली सौंदत्ते यांनी तर प्रास्ताविक महावीर सावळगे यांनी केले. यावेळी सहभागी माजी विद्यार्थी व विद्यार्थिंनी यांचा त्यांच्या परिवारासमवेत सत्कार करण्यात आला. यावेळी स्वरांजली या मराठी-हिंदी गाण्यावर आधारीत कार्यक्रमाने सर्वांना मंत्रमुग्ध केले.

समारोप सत्रात माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील सुखद अनुभव कथन करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. मुख्याध्यापक एम. एम. सनळे, बी. जी. राजमाने, एस. ए. शहापूरे, एम. एस. पाटील, एम. ए. ऐनापूरे आदी शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन दीपक कोले, संतोष चव्हाण, मुनिर शेख, नितीन निंबाळकर, सचिन आंबोळे, प्रशांत शहापूरे, दीपक पाटील, राजश्री मांजरे, सुनिता केटगाळे, संगीता माने, गीता आवटी आदींनी केले. आभार अश्विनी चव्हाण यांनी मानले.

Related posts: