|Wednesday, October 17, 2018
You are here: Home » Top News » नोटाबंदीसाठी थोडा वेळ द्यायला हवा होता : अरुंधती भट्टाचार्य

नोटाबंदीसाठी थोडा वेळ द्यायला हवा होता : अरुंधती भट्टाचार्य 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद मोदी यांनी नोटाबंदीची तयारी करण्यासाठी आणखी वेळ द्यायला हवा होता, असे मत स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी व्यक्त केले. तसेच या नोटाबंदीदरम्यान बँकांमध्ये मोठय़ा प्रमाणात दबाव पडला होता, असेही त्या म्हणाल्या.

भट्टाचार्य म्हणाल्या, मागील वर्षी 8 नोव्हेंबरला पंतप्रधानांनी पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला होता. काळापैसा, भ्रष्टाचार आणि बनावट नोटांवर लगाम लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. जेव्हा आपण नव्या गोष्टींसाठी तयार होत असतो, तेव्हा ती अत्यंत चांगली गोष्ट असते. मात्र, नोटाबंदीचा निर्णय लागू करण्यापूर्वी तयारी करण्यासाठी आम्हाला थोडा कालावधी दिला असता तर याचा दबाव निश्चितपणे कमी झाला असता.

Related posts: