|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Automobiles » लवकरच लाँच होणार जीप कंपनीची एसयूव्ही कार

लवकरच लाँच होणार जीप कंपनीची एसयूव्ही कार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

जगातील प्रसिद्ध कंपनी ‘जीप’ने एसयूव्ही कार लवकरच लाँच करण्याचा निर्णय घेतला आहे.एसयूव्ही रेनिगेड कार लाँच करण्यात येणार आहे. बाजापेठेत या कारालाही पसंती मिळेल असा विश्वास जीप कंपनीने दाखवला आहे.

जपीच्या वाहनांना पूर्वीपासूनच भारतीयांची पसंती मिळाली आहे. त्यामुळे आता येणाऱया नव्या गाडय़ाही नागरिकांना आवडतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 2020 पर्यंत इंडियन ऑटो मार्केटमध्ये 5 नव्या एसयूव्ही कार सादर करण्यात येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापैकी कॉम्पॅक्ट एसयूव्ही रेनिगेड सर्वात आधी लाँच केली जाणार आहे. एसयूव्ही रेनिगेड कार जीपची भारतीय बाजारातील सर्वात असणार आहे. जीप कंपनी इतर कॉम्पॅक्ट सेडान क्रेटा आणि डस्टर याच्या आधारे रेनिगेडची किंमत ठरवणार आहे. सध्या जगातील इतर देशांमध्ये रेनिगेडची जी साईज उपलब्ध आहे त्याची लांबी 4.2मीटर, उंची 1.7मीटर आणि रूंदी 9.1मीटर आहे. याच सेगमेंटच्या क्रेटाची लांबी 4.2मीटर, उंची 1.6मीटर आणि रूंदी 1.8मीटर आहे. तसेच रेनिगेडमध्ये 2.0लीटरचे डिझेल इंजिन असण्याची शक्यता आहे.

 

Related posts: