|Wednesday, December 12, 2018
You are here: Home » उद्योग » मारुती सुझुकीच्या नफ्यात 3 टक्क्यांची वृद्धी

मारुती सुझुकीच्या नफ्यात 3 टक्क्यांची वृद्धी 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

आर्थिक वर्ष 2017-18 च्या दुसऱया तिमाहीत मारुती सुझुकीचा नफा 3.41 टक्क्यांनी वाढत 2,484 कोटी रुपयांवर पोहोचला. गेल्या आर्थिक वर्षातील समान कालावधीत कंपनीचा नफा 2,402 कोटी रुपये होता. गेल्या तिमाहीच्या दरम्यान वस्तूंच्या किमतीत वाढ आणि जाहिरातींसाठी अधिक खर्च करण्यात आल्याने मार्जिन घटला आहे. दुसऱया तिमाहीत कंपनीचा मार्जिन घटत 16.9 टक्क्यांवर पोहोचला. दुसऱया तिमाहीत मारुती सुझुकीचे उत्पन्न 7 टक्क्यांनी वाढत 2,17,682 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. गेल्या आर्थिक वर्षात दुसऱया तिमाहीत ते 2,03,227 कोटी रुपये होते. गेल्या तिमाहीत कंपनीला उत्पादन विक्रीतून 2,14,381 कोटी रुपये उत्पन्न होते. कंपनीचे एकूण उत्पन्न 2,22,911 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

गुंतवणूकदारांना कंपनीचा निकाल चांगला लागण्याचा अंदाज होता. त्यामुळे दिवसभर खरेदी दिसून आली. कंपनीचा समभाग 2 टक्क्यांनी वधारला होता. गेल्या तिमाहीत कंपनीने एकूण 4,92,118 युनिट्सची विक्री केली होती. गेल्या वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत त्यात 17.6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Related posts: