|Saturday, October 20, 2018
You are here: Home » उद्योग » ‘परांजपे स्कीम्स’कडून 3 नोव्हेंबरपासून गृहमहोत्सव

‘परांजपे स्कीम्स’कडून 3 नोव्हेंबरपासून गृहमहोत्सव 

प्रतिनिधी / पुणे

बांधकाम क्षेत्रातील ‘परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेड’कडून येत्या 3 ते 5 नोव्हेंबरदरम्यान पुण्यातील म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे ‘ऑप्शन्स अनलिमिटेड’ या गृहमहोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ‘परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेड’चे अध्यक्ष श्रीकांत परांजपे व व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. जीएसटीमुळे घरांच्या किमती कमी झालेल्या नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

गृहमहोत्सवास प्रवेश विनामूल्य असून प्रदर्शनाची वेळ सकाळी 9 ते रात्री 9 अशी असणार आहे. याबाबत बोलताना परांजपे म्हणाले, याअंतर्गत राज्यातील व देशातील तब्बल 8 ठिकाणी 28 गृहप्रकल्पांचे पर्याय ग्राहकांसाठी उपलब्ध राहणार आहेत. त्यांची किमत रु. 12 लाख ते रु. 12 कोटी यादरम्यान असून, समाजातील प्रत्येक आर्थिक गटाला आपल्या बजेटनुसार पर्याय निवडता येतील. संपूर्ण प्रदर्शन डिजीटलाईज्ड असून, यादरम्यान जागतिक विक्रमही (गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड) केला जाईल. 

कोल्हापूर, रत्नागिरी, बेंगळूरमधील प्रकल्पांचाही समावेश

महोत्सवात पुण्यासह खेडाशिवापूर व अन्य भागातील गृहप्रकल्पांची नोंदणी ग्राहकांना करता येईल. प्रदर्शनात राज्यातील मुंबई, नाशिक, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी या शहरांव्यतिरिक्त बेंगळूर आणि वडोदरा येथे विकसित होत असलेल्या गृहप्रकल्पांचादेखील समावेश आहे. घरांच्या अनेकविध पर्यायांबरोबरच ग्राहकांना अनेक सवलती देण्यात येणार असून, केवळ 25 हजार रुपये भरून सदनिका बुक करता येईल.

जीएसटीमुळे घरांच्या किमतीत घट नाही

जीएसटीमुळे किमती कमी झालेल्या नाहीत. बांधकाम क्षेत्राचा विचार केला, तर घरांच्या किंमती कमी होतील, या अफवा आहेत. या क्षेत्राचा नीट अभ्यास केला, तर सदनिकांच्या किमती कमी होणार नाहीत. त्यामुळे हाच काळ गृह खरेदीसाठी योग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: