|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » लोकमान्यच्या चंदगड शाखेचे नव्या इमारतीत स्थलांतर उत्साहात

लोकमान्यच्या चंदगड शाखेचे नव्या इमारतीत स्थलांतर उत्साहात 

प्रतिनिधी/ चंदगड

लोकमान्य मल्टी पर्पज को-ऑप सोसायटीच्या चंदगड शाखेचे स्वमालकीच्या नव्या इमारतीत अत्यंत उत्साहाच्या आणि मांगल्याच्या वातावरणात स्थलांतर झाले. चंदगड पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठय़ा संख्येने कार्यालयास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.

चंदगड येथे 2005 साली सुरू झालेल्या लोकमान्य मल्टीपर्पजच्या शाखेचे वटवृक्षात रूपांतर झाले असून या शाखेकडे सुमारे 10 कोटीच्या ठेवी आहेत. नवीन इमारतीतील स्थलांतराच्या पहिल्याच दिवशी 10 लाखांच्या नव्या ठेवी आल्या. संस्थेने आणि शाखेने केलेल्या नेत्रदीपक प्रगतीबाबत उपस्थितानी समाधान व्यक्त केले. लोकमान्यचे संचालक गजानन धामणेकर, संचालक प्रभाकर पाटकर, क्षेत्रियकार्यालय व्यवस्थापक अभिजित संभाजी यांनी लोकमान्यच्या विविध क्षेत्रातील कामगिरीबाबतची माहिती दिली. प्रामुख्याने लोकमान्यकडे ज्येष्ठ नागरिकांच्या मोठय़ा प्रमाणावर ठेवी असून ज्येष्ठ नागरिकांना जीने चढण्याउतरण्याचा त्रास होऊ नये, यासाठी लोकमान्यचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी विशेष काळजी घेतलेली असून त्याचाच एक भाग म्हणून चंदगडची शाखा तळमजल्यावर आणली असल्याचे संचालक गजानन धामणेकर यांनी सांगितले. ठेवी आणि कर्ज, शिक्षण, आरोग्य सेवा, विमा, पर्यटन, रियल इस्टेट आदी सर्वच आघाडय़ांवर लोकमान्यची यशस्वी वाटचाल सुरू असून त्याद्वारे समाजाची सेवा घडत असल्याचे बळीराजा शेतकरी संघटनेचे नितिन पाटील यांनी सांगून या संस्थेने आपल्याला आयुष्यात उभे केल्याचे कौतुकाने सांगितले. लोकाभिमुख कारभार करून लोकांच्या हदयात घुसण्याचे अवघड काम लोकमान्यने केले असून यापुढच्या काळात लोकसहभाग वाढवून वाटचाल करण्याचा लोकमान्यचा संकल्प असल्याचे अभिजित संभाजी यांनी सांगितले. स्वागत व्यवस्थापक नरसिंग गुरव यांनी केले. यावेळी भास्कर कामत, मल्लिकार्जुन वाटंगी, बाबुराव हळदणकर, हिरामनी हुंबरवाडी, सतिश सबनीस, वैजाप्पा वाली, रघुनाथ जोशी, सदानंद बल्लाळ, विजय टोपले, गोपाळ पिळणकर, सुधीर देशपांडे, दादा वणकुंदे, क्रांतीकुमार कुलकर्णी, सदानंद सामंत, मनोहर सामंत, श्रीकांत सामंत, सुनील वाडकर, कृष्णा गडकरी, शिवाजीराव पाटील, मारूती औंधकर, वसंत बल्लाळ, विभागीय व्यवस्थापक श्रीकांत हातकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, अंतोन नोरोना, जगन्नाथ देसाई, मिलिंद सडेकर, सुरेश सातवणेकर, श्रीकांत मांद्रेकर आदी कार्यकर्त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.