|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » नुकसान भरपाई आठवडय़ात शेतकऱयांच्या खात्यावर

नुकसान भरपाई आठवडय़ात शेतकऱयांच्या खात्यावर 

सोलापूर / प्रतिनिधी

रब्बी हंगामातील झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकाची सुमारे 57 कोटी रूपये नुकसान भरापाई शासनाकडून प्राप्त झाली असून पुढील एका आठवडय़ाच्या  आत संबंधित शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी तहसिलदारांच्या बैठकीत दिल्या.

दुष्काळी निधी संदर्भात शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांच्याउपस्थित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी रेळेकर यांनी जिह्यातील तहसिलदारांना सूचना दिल्या आहेत.

  शन 2015-16 मध्ये पडलेल्या दुष्काळापोटी शासनाकडून शेतकऱयांना 57 कोटी रूपयांची दुष्काळी निधी मंजूर करण्यात आले होता. मात्र लाभार्थी 80 टक्के शेतकऱयांचे जिल्हा मध्यवर्ती बँकेत त्यांचे खाते आहे. या बँकेत चार अंकी खाते नंबर असल्यामुळे निधी वाटपासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱयांकडून 12 अंकी खाते नंबर घेवून एका आठवडय़ात दुष्काळ निधी त्यांच्या खात्यावर जमा करावे अशाप्रकारच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी तहसिलदारांना दिल्या आहेत.  ज्या शेतकऱयांनी 12 अंकी खाते नंबर दिले त्यांना स्टेट बँक ऑफ इंडिया बॅकेच्या माध्यमातून आरटीजीएसजाच्या साहय्याने त्या त्या शेतकऱयांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत.

   2015-16 दरम्यान पावसामुळे जिह्यात शेतकऱयांचे रब्बी पिकांचे मोठय़ाप्रमाणावर नूकसान झाले होते. जिल्हय़ातील चार लाख 50 हजार 194 बाधीत शेतकरी आहेत यापैकी 4 लाख 21 हजार 533  शेतकऱयांना  दुष्काळ निधी त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. मात्र दुष्काळ निधी वाटपासाठी अडचण निर्माण झालेली आहे. दुष्काळी निधीसाठी पात्र असलेले 80 टक्के शेतकऱयांचे खाते मध्यवर्ती बँकेत असून या बँकेत 4 अंकी खाते नंबर असल्यामुळे निधी वाटपासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱयांकडून स्टेट बँक ऑफ इंडियाचे 12 अंकी खाते नंबर घेवून आरटीजीएस च्या साहय्याने प्रत्येक शेतकऱयांच्या खात्यावर एका आठवडय़ात दुष्काळ निधी जमा करण्याच्या सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अजित रेळेकर यांनी उपस्थित तहसिलदारांना सूचना दिल्या आहेत.

Related posts: