|Monday, January 22, 2018
You are here: Home » Top News » सोलापूर- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पुढच्या चार महिन्यांसाठी रद्द

सोलापूर- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस पुढच्या चार महिन्यांसाठी रद्द 

ऑनलाईन टीम / पुणे :

सोलापूर- पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 1 नोव्हेंबरपासून पुढच्या चार मीहन्यांसाठी रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हा निर्णय घेतल्यानंतर प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वेकडून कुठलीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही. सोलापूर – दौंड रेल्वेमार्गावर वाशिंबे ते जेऊर दरम्यान रेल्वेमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी येत्या 1 नोव्हेंबरपासून 125 दिवसांसाठी दररोज पावणे दोन तास रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुणे- सोलापूर – पुणे इंटरसिटी व शिर्डी – पंढरपूर -शिर्डी या दोन प्रवासी गाडय़ा संपूर्ण कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहेत. तर अन्य काही गाडय़ा ठराविक मार्गावर धावणार आहेत.

 

Related posts: