|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » कोल्हापूरात ऊस वाहतूक रोखली ; स्वाभिमानीकडून टॅक्टरची तोडफोड

कोल्हापूरात ऊस वाहतूक रोखली ; स्वाभिमानीकडून टॅक्टरची तोडफोड 

ऑनलाईन टीम / कोल्हापूर :

उस दर जाहीर होण्याआधीच कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाला सुरूवात केली आहे. शुक्रवारी मध्यरात्री साखर कारखन्यांकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून टॅक्टरची तोडफोड केली. यंदाच्या हंगामात ऊस वाहतूक करणाऱया टॅक्टरवर हल्ला करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. यामुळे आगामी काळात ऊस आंदोलन तापण्याचे संकेत मिळत आहेत.

आज दुपारी जयसिंगपूर येथे होणाऱया स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पहिल्या बार फुटणार आहे. संघटना 3300 रूपयांची पहिली उचल देण्यासाठी मागणी करणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. ऊस दराची कोंडी फुटल्याशिवाय ऊस तोड घेऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेम केले आहे.

 

Related posts: