|Sunday, July 21, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘छंद प्रितीचा’ 10 नोव्हेंबर ला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

‘छंद प्रितीचा’ 10 नोव्हेंबर ला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित 

ऑनलाईन  टीम / मुंबई  :

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक आकर्षक भाग म्हणजे संगीत… त्यात लोकसंगीताचा बाज आला तर रसिकमनांसाठी ही पर्वणीच ठरते. अशा संगीतमय चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. याच धाटणीचा लोकसंगीताशी निगडीत छंद प्रितीचा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, ज्यात एका शाहीराचा संगीतमय प्रवास उलगडत जातो. प्रेमला पिक्चर्स निर्मित हा चित्रपट 10 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या कथेला साजेसं संगीत प्रविण कुवर यांनी दिलं असून बेला शेंडे, आदर्श शिंदे, जावेद अली, केतकी माटेगावकर, वैशाली सामंत, आणि नंदेश उमप यांचे स्वर लाभले आहेत.या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे आणि हर्ष कुलकर्णीबरोबर विकास समुद्रे शरद पोंक्षे, गणेश यादव, सुहासिनी देशपांडे, अभिषेक कुलकर्णी आणि विशाल कुलथे महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक एन. रेळेकर यांनी केले असून दिग्दर्शनाबरोबरच कथा – पटकथा – गीतलेखनाची धुराही एन. रेळेकर यांनीच सांभाळली आहे. तर निर्मिती चंद्रकांत जाधव