|Sunday, July 15, 2018
You are here: Home » Top News » शेतकऱयांनी शासनाच्या विविध योजना समजून घ्याव्यात : चंद्रकांत पाटील

शेतकऱयांनी शासनाच्या विविध योजना समजून घ्याव्यात : चंद्रकांत पाटील 

जळगाव / प्रतिनिधी :

जमिनीची उत्पादकता वाढविल्याशिवाय शेतकऱयांना चांगले उत्पन्न मिळणार नाही. शेतकयांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. शेतकयांनी शासनाच्या या विविध योजना समजून घ्याव्यात व त्या माध्यमातून जमिनीची उत्पादकता वाढविण्यावर भर द्यावा, असे महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले, शेतमालाचे उत्पन्न वाढल्याशिवाय शेतकरी सुखी होणार नाही. संत मुक्ताई शुगर अँन्ड एनर्जी ली. साखर कारखानाच्या माध्यमातून शेतकऱयांना दुहेरी फायदा मिळणार आहे. शेतकऱयांना साखरेसोबत सहवीज निर्मिती प्रकल्पापासून मिळणारे उत्पन्नही मिळणार आहे. शासनाच्या माध्यमातून आता शेतातील पिकाच्या प्रत्येक घटकांची विक्री होणार आहे. यासाठी शासन ज्या भागात ज्या पीकांचे उत्पादन मोठया प्रमाणात होते त्या पीकावर त्याचठिकाणी प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करण्यास प्राधान्य देत आहे. या प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून शेतकऱयांना चांगला भाव मिळण्यास मदत होणार आहे.

Related posts: