|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » मुंबईची जीवनवाहिनी ठरते अपघातवाहिनी

मुंबईची जीवनवाहिनी ठरते अपघातवाहिनी 

प्रतिनिधी/ मुंबई

मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरीय लोकल रेल्वे प्रवाशांसाठी धोकादायक ठरू लागली आहे. रेल्वे प्रवासादरम्यान गेल्या 10 महिन्यांत झालेल्या अपघातांमध्ये 2 हजार 472 प्रवाशांचा मफत्यू झाला आहे. सर्वाधिक 305 प्रवाशांचे मफत्यू हे कल्याण आणि कुर्ला या स्थानकावर झाले आहेत.

रेल्वे प्रवासादरम्यान रुळ ओलांडणे आणि लोकलमधून पडून होणाऱया अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 10 महिन्यांमध्ये रेल्वे प्रवासादरम्यान विविध अपघातांमध्ये 2 हजार 109 प्रवाशांचा मफत्यू झाला. यामध्ये पुरुष प्रवाशांची संख्या 2 हजार 845 आहे. तर 361 महिला आणि अन्य 2 प्रवाशांचाही समावेश आहे. मृत्युमुखी पडलेल्या 803 प्रवाशांची ओळख पटू शकलेली नाही. तसेच विविध स्थानकांदरम्यान झालेल्या अपघातांमध्ये 10 महिन्यांत 2 हजार 834 जण जखमी झाले. यामध्ये 516 महिलांचा समावेश होता.

सर्वाधिक अपघातांचे प्रमाण डोंबिवली ते कल्याण रेल्वे पोलिसांच्या हद्दीत आहे. 10 महिन्यात या दोन्ही रेल्वे पोलिसांच्या हद्दींमध्ये 447 जणांचा मफत्यू झाला. अंधेरी आणि बोरिवली रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 358 प्रवाशांचा मफत्यू झाला. कल्याण रेल्वेच्या हद्दीत 305 प्रवाशांचा तर कुर्ला स्थानकाच्या हद्दीत 274 प्रवाशांचा मफत्यू झाला. डोंबिवली 142, अंधेरी 104, बोरिवली 254, वसई 179, वाशी रेल्वे पोलिसांच्या हद्दीत 140 प्रवाशांचा मफत्यू झाला आहे. 38 प्रवाशांचे मफत्यू चर्चगेट रेल्वे पोलिसांच्या हद्दीत झाले आहेत.

Related posts: