|Monday, January 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा

काँग्रेस नेते संजय निरुपम यांच्याविरोधात गुन्हा 

प्रतिनिधी/ मुंबई

मुंबईसह कल्याण, डोंबिवली येथे मनसैनिकांकडून फेरीवाले हटाव मोहीम सुरू असतानाच, चिथावणीखोर भाषण देत फेरीवाल्यांना भडकावल्याप्रकरणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांच्यावर मालाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निरुपम यांच्यावर विनापरवानगी सभा घेणे आणि प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप असून, याचा अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मनसैनिकांनी फेरीवाल्यांविरोधात हटाव मोहीम सुरू केल्यानंतर   राजकीय वातावरण चांगलेच तापले. मालाडमध्ये शनिवारी काँग्रेस नेते संजय निरुपम यांची सभा झाली. या सभेदरम्यान त्यांनी फेरीवाल्यांसमोर भडकाऊ,  चिथावणीखोर भाषण केले होते. त्याचदिवशी काही वेळानंतर  फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला केला होता.

या हल्ल्याचे निरूपम यांनी  समर्थन केले होते. या हल्ल्यानंतर मालाड येथे मनसेचे नेते आणि कार्यकर्ते जमा झाले होते. यावेळी मनसे नेत्यासह कार्यकर्त्यांनी पोलिसांशीही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला होता.

तसेच या ठिकाणी निरूपम यांनी परवानगी न घेता सभा घेतली होती. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मनसे कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱया सात हल्लेखोरांना अटक केली असून, त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related posts: