|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » ओपा-खांडेपार येथे अपघातात युवक जागीच ठार

ओपा-खांडेपार येथे अपघातात युवक जागीच ठार 

प्रतिनिधी/ फोंडा

ओपा-खांडेपार येथे दुचाकी व मिनीबसच्या झालेल्या अपघातात दुचाकीचालकांचा जागीच मृत्यू झाला. ओपा-खांडेपार येथील गावकर्स नंदनवन स्पाईस फार्मजवळ हा अपघात घडला. नफिझ मोहसिन मोहम्मद (27, मुळ. बिहार सध्या रा. क

ाsडार) असे त्याचे नाव आहे. काल रविवार दुपारी 2.30 वा. हा अपघात घडला.

फोंडा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत नफिज आपल्या एम्बिशन या दुचाकीने जीए 02 पी 3667 खांडेपारहून कोंडारच्या दिशेने जात होता.  गावकर्स नंदनवनजवळ येथे उलटया दिशेने पार्क करून ठेवलेल्या पर्यटक प्रवाशी बस जीए 01 झेड 8721 या गाडीला जोरदार धडक दिली. रस्त्याच्या बाजूला समोर पार्क करून ठेवलेल्या प्रवासी बसला पाहून गोंधळलेल्या दुचाकीचालकाने तीला सरळ धडक दिली असावी असा प्राथमिक अंदाज पोलीसांनी वर्तविला आहे. धडक एवढी जबरदस्त होती दुचाकी सरळ प्रवाशी बसच्या पुढील चाकात अडकली. त्यात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने जागीच गतप्राण झाला. फोंडा पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला. मयत नफिझ हा मुळ बिहार येथील असून सध्या कोडार येथे राहत होता. जेसीबी चालक म्हणून तो कामाला होता.

 याप्रकरणी फोंडा पोलीस स्थानकांचे उपनिरीक्षक अरूण बाक्रे यांच्या  मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद साळूंके अधिक तपास करीत आहे.