|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » उद्योग » 2019 पासून कार महागणार

2019 पासून कार महागणार 

एअरबॅग्स, स्पीड अलर्ट असणार बंधनकारक :

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 1 जुलै 2019 पासून एअर बॅग्स् आणि स्पीड अलर्ट बंधनकारक करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवीन नियमांसाठी दळणवळण मंत्रालयाकडून मान्यता देण्यात आली आहे. मात्र याचा फटका कार ग्राहकांना बसणार आहे. ही उपकरणे बसविण्यात आल्याने कारच्या किमती 8 ते 10 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे.

कार चालकाने 80 किमी प्रतितास वेग पार केल्यास सूचना देण्याचे काम करण्यात येईल. याव्यतिरिक्त प्रवाशांना सीट बेल्ट बांधण्यासाठी अलर्ट, रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, सेन्ट्रल लॉक सिस्टीम यांचा वापर अनिवार्य असणार आहे. सध्या महाग असणाऱया गाडय़ांमध्ये या सेवा आहेत. तसेच त्या सर्व गाडय़ांसाठी बंधनकारक नाही. किफायतशीर किमतीतील कारमध्ये या सेवा देण्यात आल्याने किमत वाढतील असे सांगण्यात आले. सध्या देशातील 20 ते 25 टक्के कारमध्ये या सेवा देण्यात येत नाहीत.

नवीन कारमध्ये सरकारच्या नियमानुसार सेवा देण्यात आल्याने कारच्या किमती 40 हजार ते 60 हजार रुपयांपर्यंत वाढतील असे या क्षेत्रातील तज्ञांचे म्हणणे आहे. सध्या देशात रस्ते अपघातात दरवर्षी 1.5 लाख लोकांचा मृत्यू आहे. 2020 पर्यंत हा आकडा 50 टक्क्यांपर्यंत घटविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. अनेक विदेशी कार उत्पादक कंपन्या पहिल्यांपासूनच सुरक्षेच्या नियमांचे पालन करतात.

सुरक्षेसाठी…

युरोपियन महासंघाच्या नियमाप्रमाणे, भारतात नवीन सुरक्षा नियम कायदे ऑक्टोबर 2017 ते 2020 पर्यंत लागू करण्यात येतील. नवीन मॉडेलसाठी फुल फ्रन्टल, ऑफसेट फ्रन्टल, लॅटरल अथवा साईड इम्पॅक्ट नियम 1 ऑक्टोबर 2017 पासून लागू हाणार आहेत. सध्या वापरात असणाऱया वाहनांमध्ये हे नियम 1 ऑक्टोबर 2019 पासून बंधनकारक असणे आवश्यक आहे. नवीन वाहनांसाठी 1 ऑक्टोबर 2017 आणि जुन्या वाहनांसाठी 1 ऑक्टोबर 2020 पासून पादचारी सुरक्षा नियम लागू होतील.

Related posts: