|Friday, February 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हिमाचल : निवडणूक कर्मचाऱयांच्या नशिबी पायपीट

हिमाचल : निवडणूक कर्मचाऱयांच्या नशिबी पायपीट 

हेलिकॉप्टर उपलब्ध न झाल्यास 75 किलोमीटरची पायपीट : दुर्गम भागांचे प्रमाण राज्यात अधिक

वृत्तसंस्था/ शिमला

 हिमाचल प्रदेशात लोकशाहीचे पर्व म्हणजेच निवडणूक घेणे सोपे काम नाही. येथील भौगोलिक विषमता पाहता अनेक भागांमध्ये निवडणूक कर्मचाऱयांना पोहोचविणेच अवघड आहे. निवडणूक घेत कोणत्याही पक्षाच्या सरकारला सत्तेत आणण्यासाठी मतदान पथकांना येथे 15 किलोमीटरपर्यंतचा पायी कठीण प्रवास करावा लागणार आहे.

जर हवामानाने धोका दिला आणि हेलिकॉप्टर उडू शकले नाही तर निवडणूक कर्मचाऱयांना 75 किलोमीटरचा पायी प्रवास करण्यासाठी तयार रहावे लागेल. 75 किलोमीटर अंतरावरील  कांगडा जिल्हय़ाच्या भंगाल मतदान केंद्रापर्यंत कर्मचाऱयांच्या पथकाला पोहोचावे लागणार आहे.

 सर्वात उंचीवरील मतदान केंद्र

हिमाचल प्रदेशात असे देखील मतदान केंद आहे, ज्याला जगातील सर्वाधिक उंचीवर मतदान केंद्र असण्याचा मान मिळाला आहे. परंतु या मतदान केंद्रांपर्यंत पोहोचणे एखाद्या परिक्षेपेक्षा कमी नाही. जगातील सर्वाधिक उंचीवरील मतदान केंद्र लाहुल स्पीति जिल्हय़ातील हिक्कीम ठरले असून येथे 46 जण मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यात काही मतदानकेंद्रांच्या ठिकाणी जाण्याकरता 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. अशा मतदानकेंद्रांची संख्या 10 पेक्षा अधिक आहे.

3-4 दिवसांचा कालावधी

शिमला जिल्हय़ातील कासा तसेच कांगडा जिल्हय़ाच्या बडा भंगाल मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी 75 किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो किंवा तेथे केवळ हेलिकॉप्टरनेच जाणे शक्य आहे. निवडणूक कार्यासाठी तैनात कर्मचारी आणि सामग्री तेथे हेलिकॉप्टरच्या मदतीने पाठविली जाते. कर्मचाऱयांना तेथे पोहोचण्यासाठी 3-4 दिवसांचा वेळ लागतो. 

  राज्यात असे देखील मतदान केंद्र आहे, जेथे निवडणूक कर्मचाऱयांना नौकेनेच पोहोचावे लागते. याशिवाय अन्य कोणताही पर्यायी मार्ग नाही. सत कुठेड मतदानकेंद्र एका धरणाच्या जलसाठय़ाच्या पलिकडे असून तेथे जाण्यासाठी कर्मचाऱयांना नौकेची मदत घ्यावी लागते. या मतदानकेंद्रावर 400 पेक्षा अधिक जण मतदानाचा हक्क बजावतील.

सर्वाधिक-सर्वात कमी मतदार

सर्वात कमी मतदार असणारे केंद्र किन्नौर गावात असून तेथे केवळ 6 जणांना मतदानाची संधी आहे. सर्वाधिक मतदार असणारे केंद्र सोलन जिल्हय़ातील वॉर्ड क्रमांक दोन असून तेथे 1889 मतदार आहेत.

कठीण कार्य

?1440 मतदानकेंद्रांवर अर्धा तास पायपीट
केल्यावरच पोहोचता येते.

?810 मतदानकेंद्रांवर जाण्यासाठी 3-5 किलोमीटर पायपीट करावी लागते.

?90 मतदानकेंद्रांसाठी 5-10 किलोमीटर पायपीट करणे भाग.

?46 मतदारांना सर्वाधिक उंचीवरील मतदानकेंद्रात मतदानाची संधी.

Related posts: