|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » राज्यातील 96 हजार कि.मी.रस्ते खड्डेमुक्त : चंद्रकात पाटील

राज्यातील 96 हजार कि.मी.रस्ते खड्डेमुक्त : चंद्रकात पाटील 

पंढरपूर / प्रतिनिधी

राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असणारे 96 हजार कि.मी.चे रस्ते  15 डिंसेबरपूर्वी खड्डेमुक्त करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकात पाटील यांनी दिली. 

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकातदादा पंढरपुरात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार   उपस्थित होते.

पाटील म्हणाले, राज्यातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. सर्वत्र खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे. यासाठी राज्यातील 96 हजार कि.मी.चे रस्ते दुरूस्त करण्यासाठी टेंडरप्रक्रिया आणि वर्कऑर्डर काढण्यात आली आहे. यासाठी लवकरच कामाला सुरूवात केली जाणार आहे. त्यामुळे आता 15 डिसेंबरपूर्वी खड्डेमुक्त महाराष्ट्राचा पहिला टप्पा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग दोन वर्षे दुरूस्तीसाठी राज्य शासनाचे पीडब्लूडी खाते करणार आहे. त्यामुळे आता खड्डेमुक्त महाराष्ट्राकडे वाटचाल सुरू असल्याचे सांगितले.

ऊस दराचा प्रश्न सध्या गाजत आहे. यासाठी एफ्ढआरपी कायदाच आहे. त्यामुळे कारखान्याना एफ्ढआरपी द्यावी लागणार आहे. मात्र, कारखान्यांच्या बॅलन्सशिटवर जर फ्ढायदा जास्त असेल. तर सध्याच्या 3400 रूपये उसाच्या मागणीपेक्षा जास्त एफ्ढआरपी जास्त मिळाला तर आनंदच असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच मंदिर समितीसाठी तीन सदस्य घेण्यात येणार आहे. याकरिंता वारकरी सांप्रदाय जे सांगतील तेच सदस्य आपण घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.  सहअध्यक्ष मंदिरातील धार्मिक कार्ये करतील. तर अध्यक्ष राज्यातील तसेच सरकारकडील कामे आणि चांगल्या प्रकारचा निधी आणून प्रशासकीय कामे करतील असे देखिल त्यांनी यावेळी सांगतिले.

वाळू उपशामुळे चार बालके नदीमध्ये मृत्यू पावली. याबाबत त्यांना विचारणा केली असाता, त्यांनी याबाबत बोलणे टाळले. पत्रकार परिषद झाल्यानंतर येथील वासकर वाडा, देहूकर वाडा तसेच यादवबाबा मठ, अंमळनेरकर मठ याठिकाणी जाऊन विविध महाराज मंडळींच्या गाठीभेटी घेतल्या मंदिर समिती तसेच येथील विकासाबाबत चर्चाही केली.

  आषाढीची महापूजा हसण्यावर

राज्याचे महसुलमंत्री चंद्रकात पाटील पंढरपूरात आले होते. यावेळी त्यांना आपण ‘आषाढी यात्रेची महापूजा करण्यास येणार का’ असा सवाल येथील पत्रकारांनी केला. यावेळी त्यांनी काहीक्षण थांबत हसण्यावर हा प्रश्न नेला. त्यामुळे महसूलमंत्र्याच्या हसण्याचा नक्की अर्थ काय होता, यांची चर्चा आता रंगू लागली आहे.