|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » हेस्कॉमचा बेळगाव ग्रामीण विभाग पहिल्या पॉवर अवॉर्डचा मानकरी

हेस्कॉमचा बेळगाव ग्रामीण विभाग पहिल्या पॉवर अवॉर्डचा मानकरी 

 

प्रतिनिधी/ बेळगाव

राज्यातील उत्तम कामगिरी करणाऱया विद्युत विभाग व कर्मचाऱयांचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘पॉवर अवॉर्ड’चा पहिला मानकरी हेस्कॉमचा बेळगाव ग्रामीण विभाग ठरला आहे. संपूर्ण राज्यात महसूल वसुलीमध्ये विभागाने द्वितीय तर हेस्कॉम विभागामध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे. हेस्कॉमच्या बेळगाव विभागाला प्रथमच असा पुरस्कार मिळाल्याने इतर विभागांना याची पेरणा मिळणार आहे.

नुकतेच राज्य ऊर्जा मंत्रालयाच्यावतीने बेंगळूर येथे पॉवर अवॉर्ड 2017 चे आयोजन करण्यात आले होते. ऊर्जा विभागात उत्तम कामगिरी केलेल्या विभागांच्या पाठीवर थाप देण्यासाठी या विशेष पुरस्काराचे आयोजन केले होते. 2016-17 मध्ये चांगली कामगिरी करणाऱया 84 विभाग व कर्मचाऱयांना यावेळी गौरविण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला ऊर्जामंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी हेस्कॉमबरोबर राज्यातील सर्व ऊर्जा विभागांचे पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बेळगाव हेस्कॉम ग्रामीणचे कार्यकारी अभियंते प्रवीणकुमार चिकार्डे, बेळगाव पश्चिम विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते विनोद करूर, पूर्व विभागाच्या साहाय्यक कार्यकारी अभियंत्या वानेश्री, खानापूर विभागाचे साहाय्यक कार्यकारी अभियंते एस. पी. आलपुंटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बेळगाव विभागात उत्तम कामगिरी करणाऱया या अधिकाऱयांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

चषक व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. बेळगाव विभागात अशा प्रकारचा हा पहिलाच पुरस्कार असल्याने हेस्कॉमच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ग्रामीण भागातूनही अधिकाधिक महसूल जमा करण्यात या विभागाला यश मिळाले आहे. बेळगाव हेस्कॉम ग्रामीण विभागामध्ये बेळगाव व खानापूर तालुक्मयांचा समावेश होतो. त्यामुळे येथील ग्राहकांचेही अभिनंदन होत आहे.

ग्राहकांच्या सहकार्यामुळेच मिळाला पुरस्कार

-प्रवीणकुमार चिकार्डे (कार्यकारी अभियंते, हेस्कॉम ग्रामीण)

मिळालेले हे यश फक्त अधिकाऱयांचे नाही तर हेस्कॉममध्ये काम करणाऱया प्रत्येक कर्मचाऱयाचे आहे. ग्रामीण भागातल्या ग्राहकांनीही वेळच्यावेळी बिले भरून सहकार्य केल्यानेच हा पुरस्कार मिळाला आहे. या यशात त्यांचाही तितकाच हातभार आहे. यापुढे याहून अधिक चांगले काम करून ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.   

Related posts: