|Sunday, July 15, 2018
You are here: Home » विविधा » सचिन पिळगांवकर यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव’

सचिन पिळगांवकर यांना ‘पुलोत्सव जीवनगौरव’ 

पुणे / प्रतिनिधी :

पुलोत्सवाच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‘पुलोत्सव जीवनगौरव सन्मान’ ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर यांना जाहीर झाला आहे. येत्या 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे पुरस्कार वितरण सोहळा रंगणार असल्याची माहिती पुलोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.

आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 9 ते 12 नोव्हेंबर दरम्यान पुलोत्सव आयोजित केला आहे. 25 हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे ‘जीवनगौरव पुरस्कारा’चे स्वरूप आहे. जीवनगौरव पुरस्काराबरोबरच अभिनेता अमेय वाघ आणि प्रियंका बर्वे यांना ‘पुल तरूणाई सन्मान’ देण्यात येणार आहे. 21 हजार रूपये रोख, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

यानिमित्ताने दिलीप पाडगावकर, गोविंद तळवळकर, अरूण साधू, आणि ह.मो. मराठे या चार संपादकांवर आधारित येत्या 11 नोव्हेंबर रोजी ‘चार संपादक’हा परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. या परिसंवादात, रविमुकुल, राजीव खांडेकर, आनंद आगाशे, दिनकर गांगल या चार संपादकांचा सहभाग असणार आहे, तर 12 नोव्हेंबरली ‘शब्दप्रभू पुल’ हा परिसंवाद होणार आहे. या परिसंवादामध्ये मुकुंद टाकसाळ, डॉ. मंदार परांजपे, मिलिंद जोशी आणि चंद्रकांत काळे सहभागी होणार आहेत. दोन्ही परिसंवाद महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये सकाळी 11 वाजता होणार आहेत.

Related posts: