|Monday, July 22, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

शनिचा धनू राशित प्रवेश भाग दुसरा

बुध. दि. 1  ते 7 नोव्हेंबर 2017

धनू राशीत प्रवेश केलेला शनि अतिशय कडक आहे. त्याची शांती करावी लागेल, अशी भीती काहीजण घालत असल्याचे ऐकीवात आले. ज्या राशीना साडेसाती सुरू आहे त्यांनी तर रडकुंडीला यावे अशी भीती काहीजण घालत असल्याचे लोकांच्या चर्चेतून समजले जे सरळ व न्याय मार्गाने जातात. त्यांना हा शनि राजयोगासारखे फळ देईल. तुमची रास कोणतीही असो साडेसाती असेल तरीही हा शनि चांगलेच फळ देईल शनि बदलल्यावर ताबडतोब त्याचे फळ मिळत नाही. अडीच वषांच्या कालावधीत शेवटच्या सहा महिन्यात तो बरे वाईट फळे देईल. मनुष्यप्राण्याच्या सर्व बऱया वाईट कर्माचा हिशोब शनि ठेवत असतो. जसे कर्म तसे फळ हा त्याचा न्याय आहे. त्यामुळे या शनिच्या कालखंडात आपल्या हातून कुणा अपमान अथवा कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. यम हे शनिचे स्वरुप आहे हे लक्षात ठेवावे शनिच्या कारकत्वाचा नीट अभ्यास केल्यास त्याच्यासारखा दाता कुणी नाही व तो चिडला तर राजाचा रंक व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे शनिच्या बाबतीत सर्वांनी नमून राहणे योग्य ठरते. पूजा, अर्चा, मंत्रजप हा भाग वेगळा आहे. कर्म स्वच्छ ठेवणे हा शनिला खूष ठेवण्याचा राजमार्ग आहे. शनिच्या या कालखंडात अनेकांचे भाग्य उजळणार आहे. शनिच्या साडेसातीच्या काणत फार त्रास होतो ते चुकीचे नाही. पण त्याला शनि कारणीभूत नाही. कळत नकळत आपल्या हातून घडलेल्या चुका व अक्षम्य अपराधाची ती शिक्षा असते अनेक लोक देव देव करतात सतत पूजा पाठात मग्न असतात. हजारो रुपये खर्चून महागडय़ा शांती करतात. चार धाम यात्रा करतात अनेक पवित्र स्थळांची तीर्थयात्रा करतात हजारो लाखो जपजाप्य करतात.पण मन जर स्वच्छ नसेल तर या सर्वाचा काहीही फायदा नाही. हे लोक खरोखरच सुखी असतात. काय हा संशोधनाचा विषय आहे. असंख्य पुण्यकर्ते करूनही लोक अपघातात मृत्युमुखी पडतात. काही तरी विचित्र प्रकरण घडून पोलीस प्रकरणात अडकतात साधे सुधे निमित्त होऊन गंभीर शस्त्रक्रियेचे प्रसंग ओढवतात. कुटुंबच्या कुटुंबे उद्ध्वस्त होतात असे का घडते याचा विचार कुणी करीत नाहीत माणूस म्हटल्यावर चुका होणारच राग, द्वेष, मत्सर, इर्षा, पोटदुखी, टीका बदनामी या बाबी आल्याच पण त्यातून जे परिणाम होतात ते मात्र महाभयंकर असतात. शनिकडे दयामाया क्षमा हा प्रकार जरा कमीच. तो जर कोपला तर एकवेळच्या अन्नाला महाग करील व प्रसन्न झाला तर सात जन्माचे कल्याण करील. शनि स्वत:हून कुणाचेही अनिष्ट करीत नाही जे कराल ते भराल हा त्याचा नियम आहे. सर्वाचेच तो भले करील या शनिचे उत्तम लाभ मिळण्यासाठी व्यसनापासून दूर रहावे. आळशीपणा सोडावा आपले नित्य नियमित कर्म व्यवस्थित करावे. कुणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी. शनि हा कायदा शास्त्राचा कारक आहे. त्यामुळे कोर्टकचेरीत खोटय़ा साक्षी दिल्यास त्याना शनि सोडणार नाही. भ्रष्टाचार व अन्यायाचे प्रमाण जेथे असेल तेथे शनिचा कोप ठरलेलाच्ला आहे. शनि चांगला असला तरी ज्या ज्या वेळी मंगळ, केतू, रवि, चंद्र तसेच ग्रहणयोगाशी त्याचा अशुभ योग होईल. त्या वेळी हाहाकार माजेल अपघात, दुर्घटना, मारामाऱया  दंगली राजकारणी नेते व चित्रपटाक्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा मृत्यू सत्तापालट अशा घटना घडतील. स्वच्छता व पावित्र्य. पाळल्यास या शनिचे शुभ परिणाम दिसून येतील. शास्त्राsक्त मंत्रोच्चाराने शनिवार केलेल्या अभिषेकाचे तेलाने स्पाँडेलायसीस हातपाय दुखणे व सांधेदुखीसारखे रोग कमी होऊ शकतात.शनिच्या अभिषेकाचे तेल नको तेथे विकण्यापेक्षा शारीरिक दुखणे बरे होण्यासाठी त्याचा वापर केल्यास लोकांचे आशीर्वाद मिळतील व शनिचा कोपही कमी होईल.

मेष

 भाग्यात  आलेल्या शनिमुळे शुभ व कल्याणकारक घटना घडतील. राजकारणात प्रवेश कराल व त्यात नावलौकीक व काळा पैसाही बऱयापैकी मिळेल. मुलामुलीच्या लग्नात कोणतेही अडथळे येणार नाहीत. वारंवार प्रवास घडतील. त्यातील  अर्धा प्रवास, देवादिकासाठी असतील तर बांधणार असाल तर पिलरवर बांधा ते लाभदायक ठरेल हे सारे अनुभव दोन वर्षांच्या कालखंडात येतील.


वृषभ

मृत्यूस्थानी शनि आलेला आहे. मोठय़ा प्रमाणात धनलाभाचे योग. भागीदारी व्यवसायात लाभ. नोकरीत उत्कर्ष होईल. अपघाताची भीती राहील.  नशेपासून दूर राहणे चांगले ठरेल. साप विंचू कुणालाही या शनिच्या कालखंडात दानधर्म केल्यास त्याचे विपरित परिणाम होतील. तुमचे वर्तन जितके स्वच्छ प्रामाणिक व न्यायी वृत्ती असेल त्या प्रमाणात शनि तुमचे सर्व संकटातून रक्षण करील.


मिथुन

सप्तमात आलेल्या शनिमुळे शुभ व कल्याणकारक घटना घडतील. राजकारणात प्रवेश कराल. व त्यात नावलौकीक व इतर मार्गाने पैसाही बऱयापैकी मिळेल. मुलामुलीच्या लग्नात कोणतेही अडथळे येणार नाहीत. वारंवार प्रवास घडतील. त्यातील अर्धे प्रवास धार्मिक कार्यासाठी असतील घर बांधणार असाल तर पिलरवर बांधा ते लाभदायक ठरेल.


कर्क

शनिचे ष÷ातील आगमन अनेक बाबतीत शुभ ठरणार आहे. करणीबाधा व शत्रुपीडा यांचा काहीही त्रास होणार नाही. वकिली, इंजिनियरिंग वगैरे क्षेत्रात असाल तर चांगले यश मिळेल. लहान भावंडांशी मतभेद होऊ शकतील. काही महत्त्वाच्या कामात अडचणी येतील या शनिच्या कालखंडात चामडय़ाच्या वस्तू वापरणे अतिशय धोक्मयाचे ठरेल. अपघात व दुर्घटनेपासून तुम्हाला सावध रहावे लागेल. नोकरी व्यवसायानिमित्त दूर जावे लागेल.


सिंह

पंचमात शनिचे झालेले आगमन काही बाबतीत एकदम शुभ फलदायक आहे. तरीसुद्धा कोणतेही काम योग्य शहानिशा करून केल्यास अपयश येणार नाही. यावषी घर बांधणार असाल तर स्वत:च्या नावावर बांधू नका… संततीबाबत चिंतेचे प्रसंग. वैवाहिक जीवनात काही कटू प्रसंग निर्माण होतील. कष्टाने कमविलेला पैसाच टिकेल. प्रेमप्रकरणात असाल तर फसगत होण्याचे योग.


कन्या

शनि चतुर्थात आल्याने स्वत:ची वास्तू होईल. हे स्थान शनिला मानवत नाही. त्यामुळे घरात काहीवेळा मतभेदाचे प्रसंग येतील. शत्रुत्वात वाढ करणारा हा शनि आहे. त्यामुळे घरासंदभांतील कोणतीही सजावट वगैरे करताना ती लोकांच्या नजरेत येईल, असे करू नका. वडिलापोर्जित संपत्ती मिळण्याचे योग आहेत.  जमिनीचे व्यवहार कारखानदारी यात मोठे धनलाभ होऊ शकतात. अति दूरवरचे अथवा परदेश प्रवास केल्यास ते लाभदायक ठरतील. कारखानदारी तसेच डोळय़ांशी संबंधित व्यवसाय असेल तर मोठे यश मिळेल.


तुळ

 चूल अथवा गॅसवरून उकळलेले पाण्याचे भांडे उतरवले तरी ते थंड होण्यास काही काळ जावा लागते. त्याच न्यायाने साडेसाती संपलेली असली तरी अजून तीन चार महिने त्याची झळ राहणार आहे. त्यामुळे महत्त्वाची कामे काही काळ जपूनच करावीत.गेल्या सात वर्षात झालेले सर्व त्रास व अडचणी यापुढे कमी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. गेलेली नोकरी अथवा व्यवसाय परत मिळवाल.


वृश्चिक

शनिचे धनस्थानी झालेले आगमन आरोग्य सुधारण्यास मदत करील. मंत्री आमदार, खासदार,सीए तसेच वकील यांच्या तोडीस तोड अशी बुद्धी चालवाल. त्यामुळे जीवनाच्या अनेक क्षेत्रात तुमचा दबदबा वाढेल. कुटुंबात मंगलकार्ये होतील. आर्थिक बाबतीत होणारे घोटाळे ऐनवेळी लक्षात आल्याने मोठे नुकसान टळेल हे सारे अनुभव दोन वर्षाच्या कालखंडात येतील.


धनु

शनिचे आगमन तुमच्या राशीत झालेले आहे. मूळ नक्षत्र असेल तर विशेष काळजी घ्या. राशीत याच प्रभाव अडीच वर्षापर्यंत राहील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. माता पित्याचा भाग्योदय होईल. नोकरीपेक्षा  स्वतंत्र व्यवसाय केल्यास भरभराट होईल. सरकारी नोकरी डॉक्टरी, कारखानदारी पेट्रोलपंप यांच्याशी संबंधित व्यवसाय केल्यास जीवनाचे सोने करू शकाल. अपघात, आजार, स्फोटक पदार्थामुळे तसेच केमिकल वगैरेपासून धोका होईल.


मकर

शनि महाराज बाराव्या स्थानी आलेले असून साडेसातीची सुरुवात होत आहे. महत्त्वाची कामे खोळंबतील. जुने घर अथवा मंदिर यांचा जीर्णोद्धार करण्याचा विचार कराल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय भाग्योदयकारक. सरकारी कामात यश, घरमालक, भाडेकरू वाद मिटतील. सांसारिक जीवनातील सर्व तऱहेचे गैरसमज निवळतील. घरदार, वाहन तसेच इतर वस्तुसाठी बराच खर्च कराल.


कुंभ

लाभात आलेल्या शनिमुळे  काळय़ा  रंगाच्या व्यवसायात उत्तम लाभ होतील. तीन चार घरे व वाहन होण्याचे योग. शेअर बाजार वगैरेत मोठे लाभ होतील. मुलाबाळांचे सौख्य चांगले राहील पण मतभेद मात्र होत राहतील. सासरच्या घराण्याचा उत्कर्ष होईल. कोणतेही व्यसन अथवा अवैध व्यवसाय नसतील तर हा शनि तुम्हाला गडगंज श्रीमंती देईल हे सारे अनुभव दोन वर्षाच्या कालखंडात येतील.


मीन

शनि दशमात आलेला आहे. नोकरी व्यवसायात उन्नती होईल. सर्व महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. सरकारी क्षेत्रात असाल तर लाभदायक योग. सर्व कामे होऊ लागतील. व्यवस्थित आश..करून घर बांधल्यास निश्चितच लक्ष्मीची कृपा होईल. तुमचे वय जर 21, 33, 39, 45 असेल तर मान सन्मान, धनदौलत सर्व काही प्राप्त कराल. दुसऱयांचे भले कराल. जमीन मालमत्तेसाठी प्रयत्न करा. हमखास यश मिळेल. चारचाकी वाहन घेण्याची संधी मिळेल.