|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » 11 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ द्या

11 महिन्यांची पुन्हा मुदतवाढ द्या 

मराठा आरक्षण हंगामी नियुक्ती : सरकारची न्यायालयाकडे विनंती

प्रतिनिधी/ मुंबई

मरा”ा आरक्षणातंर्गत न्यायालयाच्या परवानगीनंतर केलेल्या सरकारी नोकर भरतीला आणखी 11 महिन्यांची मुदतवाढ द्यावी, अशी विनंती राज्य सरकारने मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात केली. न्यायालयाने याची दखल घेत पुढील सोमवारी 6 नोव्हेंबर रोजी सुनावणी निश्चित केली आहे.

याआधी 2015 मध्ये पार पडलेल्या सुनावणीत मरा”ा आणि मुस्लीम समाजाला शैक्षणिक आणि सरकारी नोकऱयांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. राज्य सरकारच्या या निर्णयाला तत्कालीन न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांनी स्थगिती दिली होती. मात्र याचिका प्रलंबित असल्याने मरा”ा समाजासा”ाr राखून “sवलेली पदे 11 महिन्यांच्या मुदतीसा”ाr खुल्या प्रवर्गातून भरण्याची मुभा एप्रिल 2015 मधील सुनावणीत दिली. त्यानुसार खुल्या प्रवर्गातून नोकर भरती करण्यात आली. 11 महिन्यांची मुदत संपल्यानंतर न्यायालयाने या भरतीला आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ 3 नोव्हेंबर 2017 रोजी संपुष्टात येत आहे. मरा”ा आरक्षण याचिकेवरील निर्णय प्रलंबित असल्यामुळे राज्य सरकारच्यावतीने ऍड. प्रवीण सावंत यांनी अर्ज दाखल करून न्यायालयाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली. तसेच 11 महिन्यांची आणखी मुदतवाढ द्यावी अशी विनंती केली.

Related posts: