|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » भारताला एकसंघ करण्यात सरदार पटेल यांचे योगदान

भारताला एकसंघ करण्यात सरदार पटेल यांचे योगदान 

बेळगाव / प्रतिनिधी

सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष होते. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशातील सर्व संस्थानांचे विलीनीकरण करण्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. आणि भारताला एकसंघ करण्यात यशस्वी झाले, असे गौरवोद्गार प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर यांनी काढले. यावेळी बोलताना त्यांनी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांनी केलेल्या कामांचीही स्तुती केली.

जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी शहरात सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिन’ आणि इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘संकल्प दिन’ म्हणून आचरण्यात आली. कुमार गंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी कविता योगप्पण्णावर होत्या. अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि इंदिरा गांधी यांचे योगदान देशासाठी मोठे असल्याचे सांगितले. देशाच्या विकासासाठी आणि गरिबी निर्मूलनासाठी त्यांनी कार्य केल्याचे योगप्पण्णावर यांनी सांगितले.

कार्यक्रमास मुख्य वक्त्या म्हणून प्रा. गुरुदेवी हुल्लेण्णावरमठ उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्धरित्या अभ्यास करून उद्दिष्ट गाठण्यास पुढाकार घ्यावा. देशाच्या विकासासाठी कार्य करावे. शेतकरी आणि जवानांना नेहमीच गौरविण्यात यावे, असे प्रा. हुल्लेण्णावरमठ यांनी सांगितले. कन्नड आणि संस्कृती खात्याचे साहाय्यक संचालक श्रीशैल करिशंकरी, डीडीपीआय एस. बी. कांबळे व्यासपीठावर उपस्थित होते. जिल्हा माहिती आणि सार्वजनिक संपर्क खात्याचे वरि÷ साहाय्यक संचालक गुरुनाथ कडबूर यांनी स्वागत केले. नेहरू युवा केंद्राचे समन्वयक अधिकारी एस. यू. जमादार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमापूर्वी अशोक चौक (किल्ला तलाव) येथून कुमार गंधर्व रंगमंदिरपर्यंत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते.

Related posts: