|Wednesday, July 18, 2018
You are here: Home » क्रिडा » स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताचे पदक निश्चित

स्पर्धा सुरू होण्याआधीच भारताचे पदक निश्चित 

वृत्तसंस्था/ हो चि मिन्ह सिटी

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धा गुरुवारपासून सुरू होत असली तरी त्याआधीच भारताचे एक पदक निश्चित झाले आहे. बुधवारी या स्पर्धेचा ड्रॉ काढण्यात आला आणि 81 किलोवरील वजन गटात सहभागी झालेल्या सीमा पुनियाला उपांत्य फेरीत स्थान मिळाल्याचे स्पष्ट झाले. 48 किलो वजन गटातून खेळणाऱया एमसी मेरी कोम गुरुवारी आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.

सीमाच्या वजन गटात फक्त चारच मुष्टियोद्धय़ांचा सहभाग असल्याने तिला थेट उपांत्य फेरीत स्थान मिळाले. आता 7 नोव्हेंबर रोजी तिची उपांत्य लढत उझ्बेकिस्तानच्या गुझाल इस्मातोव्हाशी होणार आहे. पाचवेळची वर्ल्ड चॅम्पियन व ऑलिम्पिक कांस्यविजेत्या मेरी कोमची सलामीची लढत व्हिएतनामच्या डिएम थि ट्रिन्ह कीयू हिच्याशी होणार आहे. आशियाई स्पर्धेत मेरी कोमने चार वेळा सुवर्णपदक पटकावलेले आहे.

Related posts: