|Wednesday, September 26, 2018
You are here: Home » क्रिडा » किदाम्बी श्रीकांतची ‘पद्मश्री’साठी शिफारस

किदाम्बी श्रीकांतची ‘पद्मश्री’साठी शिफारस 

मोसमातील अपूर्व कामगिरीचा गौरव करण्याची माजी क्रीडामंत्र्यांची सूचना

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

या वषी चार सुपरसिरीज बॅडमिंटन स्पर्धेची अजिंक्मयपदे मिळवून सुपरस्टार बनलेल्या किदाम्बी श्रीकांतची प्रति÷sच्या पद्मश्री पुरस्कारासाठी माजी क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शिफारस केली आहे.

गेल्या आठवडय़ात फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर एका कॅलेंडर वर्षात चार सुपरसिरीज स्पर्धा जिंकणारा श्रीकांत पहिला भारतीय खेळाडू बनला आहे. गोयल सध्या संसदीय कामकाज मंत्री असून त्यांनी बुधवारी गृहमंत्री राजनाथ सिंग यांना पत्र लिहून श्रीकांतला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्याची शिफारस केली आहे. पद्मश्री हा भारताचा चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ‘युवा क्रीडापटूंना प्रेरित करण्यासाठी श्रीकांतच्या योगदानाचा गौरव होणे गरजेचे आहे,’ असे गोयल यांनी म्हटले आहे. गोयल यांच्यानंतर राज्यवर्धनसिंग राठोड क्रीडामंत्रीपद सांभाळत आहेत. ‘देशातील युवकांसाठी तो आदर्श खेळाडू असून लाखो लोकांना त्याच्या योगदानाचा गौरव व्हावा असे वाटते. माजी क्रीडामंत्र्याच्या नात्याने अनेकांनी मला भेटून श्रीकांतची पद्मश्री पुरस्कारासाठी शिफारस करण्याची सूचना केली. त्यांच्या भावना लक्षात घेऊनच मी श्रीकांतला हा मानाचा पुरस्कार देण्याची शिफारस करण्याची सूचना केली आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

गेल्या रविवारी श्रीकांतने जपानच्या केन्टा निशिमोटोचा पराभव करून फेंच ओपन सुपरसिरीज स्पर्धेचे जेतेपद पटकावले. श्रीकांतच्या आधी चीनचा महान खेळाडू लिन डॅन, त्याचाच देशवासी चेन लाँग, मलेशियन स्टार ली चाँग वेई यांनाच एका कॅलेंडर वर्षात एकेरीची चार सुपरसिरीज अजिंक्मयपदे मिळविता आली आहेत. या मोसमात 24 वषीय श्रीकांतने पाच स्पर्धांची अंतिम फेरी गाठली, त्यापैकी चारमध्ये जेतेपद मिळविले तर सिंगापूर ओपनमध्ये त्याला आपलाच सहकारी बी. साई प्रणीतकडून पराभव पत्करावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. महिला बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू व माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांची पद्मभूषण पुरस्कारासाठी याआधीच शिफारस करण्यात आली आहे. टेनिसचा माजी राष्ट्रीय विजेता नितीन कीर्तनेनेही आपला अर्ज पाठविला आहे. दरवषी प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी पद्मविभूषण, पद्मभूषण व पद्मश्री  पुरस्कारांची घोषणा करण्यात येतो.

Related posts: