|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार 

प्रतिनिधी/ सांगली

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषि मंत्री शरद पवार हे दोन व तीन नोव्हेंबर रोजी जिल्हा दौऱयावर येणार आहेत. गुरूवारी दोन नोव्हेंबर रोजी क्रांती उद्योगसमुहाचे प्रमख अरूण लाड यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सत्कार कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. तर तीन नोव्हेंबर रोजी तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील पाणीपुरवठा संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमास ते उपस्थित राहणार आहेत.

शरद पवार हे दुपारी दोन वाजता गाडीने कुंडल येथे क्रांती सहकारी साखर कारखान्यांच्या कार्यस्थळावर आयोजित कार्यक्रमात ते क्रांती उद्योगसमुहाचे प्रमुख अरूण लाड यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, स्वागताध्यक्ष माजीमंत्री जयंत पाटील, यांची उपस्थिती आहे. या कार्यक्रमानंतर ते हुपरी येथे जवाहर साखर कारखान्याच्या रौप्यमहोत्सवी गळीत हंगामाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. या कार्यक्रमानंतर सांगलीत ते मुक्कामी असणार आहेत.

शुक्रवारी सकाळी नऊ वाजता, तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथील सिध्दराज सहकारी शेती पाणीपुरवठा संस्था नंबर एक व दोनच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर ते साताऱयाकडे रवाना होणार आहेत.

Related posts: