|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » बिल्डर डीएसकेंच्या घरी पोलीस दाखल

बिल्डर डीएसकेंच्या घरी पोलीस दाखल 

ऑनलाईन टीम / पुणे  :

पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींविरोधात पुणे अर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करायला सुरूवात केली आहे. आज सकाळी डीएसकेंवर सेनापती बापट मार्गावरच्या घरी आणि जंगली महाराज रोडवरच्या कार्यालयात अर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱयांनी छापा घातला आहे.

डीएस कुलकर्णी यांनी गुंतवणुकदारांचे पैसे थकविल्याचा आरोप आहे. कालच अनेक गुंतवणुकदारांनी पुण्यात डीएसकेंविरोधात तक्रार नोंदवली.त्यानंतर आज डीएस कुलकर्णींच्या पुणे आणि मुंबईतल्या ठिकाणांवर कारवाई सुरू केली आहे. पुण्यातील सेनापती बापट रोडवरील निवासस्थानी, जंगली महाराज रस्त्यावरील कार्यालय,डीएसकेविश्वमधील त्यांचे घर आणि मुंबईतल्या कार्यालयावर पोलीस दाखल झाले आहेत. डीएसकेंविरोधात जवळपास तीनशेहून अधिक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना ताब्यातही घेतले जाऊ शकते.

 

Related posts: