|Saturday, October 20, 2018
You are here: Home » Top News » कर्नाटकचा धावांचा डोंगर; महाराष्ट्र बॅकफुटवर

कर्नाटकचा धावांचा डोंगर; महाराष्ट्र बॅकफुटवर 

पुणे / प्रतिनिधी :

मयांक आगरवाल आणि रविकुमार यांच्या द्विशतकी भागीदारीच्या जोरावर कर्नाटकने महाराष्ट्राविरूद्ध सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी सामन्याच्या दुसऱया दिवशी 2 बाद 461 धावांचा डोंगर उभारला. मयांकचे झुंजार द्विशतक व रविकुमारची शतकी साथ हे आजच्या दिवसाचे वैशिष्टय़ ठरले.

काल पहिल्या डावात महाराष्ट्राचा डाव 245 धावांत गारद केल्यावर कर्नाटकच्या फलंदाजांनी चिवट फलंदाजी केली. कर्नाटकने आपला पहिला डाव कालच्या बिनाबाद 117 वरून आज पुढे सुरू केला. मयांकने रणजी ट्रॉफीतील आपले पहिले द्विशतक ठोकत नाबाद 219 धावा केल्या. मयांकने 373 चेंडूत 25 चौकार आणि 2 षटकारांच्या जोरावर ही खेळी साकारली. तर रविकुमारने 219 चेंडूत 17 चौकारांच्या मदतीने 129 धावा केल्या. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 259 धावांची भागीदारी केली. तर रविकुमारनेदेखील स्थानिक स्तरावरील 6 वे शतक साजरे करत 129 धावा ठोकल्या. याबरोबरच चौथ्या क्रमांकावर खेळायला आलेला करूण नायर नाबाद 56 धावांवर खेळत आहे. महाराष्ट्राकडून चिराग खुराना आणि स्वप्नील गुगळे यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. कर्नाटकच्या फलंदाजांसमोर आज महाराष्ट्राचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. अजून दोन दिवस शिल्लक असून, यात महाराष्ट्राची कसोटी लागणार आहे.

Related posts: