|Thursday, January 17, 2019
You are here: Home » क्रिडा » टोटेनहॅमकडून रियल माद्रीद पराभूत

टोटेनहॅमकडून रियल माद्रीद पराभूत 

वृत्तसंस्था /माद्रीद :

चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत टोटेनहॅम हॉटस्परने शेवटच्या 16 संघातील आपले स्थान निश्चित करताना बलाढय़ रियल माद्रीदला पराभवाचा धक्का दिला. च गटातील या सामन्यात बुधवारी टोटेनहॅम हॉटस्परने रियल माद्रीदचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेत आता टोटेनहॅम आणि मँचेस्टर सिटी यांनी शेवटच्या 16 संघात स्थान मिळविले आहे. रियल माद्रीदला शेवटच्या 16 संघातील प्रवेशासाठी आणखी काही कालावधी वाट पाहावी लागेल. टोटेनहॅमचे च गटातून अद्याप दोन सामने बाकी आहेत.

टोटेनहॅम आणि रियल माद्रीद यांच्यात सामना टोटेनहॅमतर्फे डिली अलीने दोन गोल तर ख्रिस्टेन एरिक्सनने एक गोल केला. रियल माद्रीदतर्फे एकमेव गोल पोर्तुगालच्या ख्रिस्टीयानो रोनाल्डोने केला. या सामन्यात 27 व्या मिनिटाला अलीने टोटेनहॅमचे खाते उघडले. 56 व्या मिनिटाला रॅमोसच्या पासवर अलीने टोटेनहॅमचा दुसरा गोल केला. 65 व्या मिनिटाला एरिक्सनने टेटेनहॅमचा तिसरा गोल केला. सामना संपण्यास 10 मिनिटे बाकी असताना रोनाल्डोने रियल माद्रीदचा एकमेव गोल नोंदविला. या स्पर्धेतील रोनाल्डोचा हा सहावा गोल ठरला. स्पर्धेच्या इतिहासात गेल्या पाच वर्षांत रियल माद्रीदला प्राथमिक फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या आठवडय़ात ला लीगा स्पर्धेत गिरोनाकडून रियल माद्रीदला असा पराभवाचा धक्का मिळाला होता.

जर्मनीमध्ये सुरू असलेल्या साखळी फुटबॉल स्पर्धेत ऍपोएलने बोरूसिया डॉर्टमंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेत मँचेस्टर सिटीने आपली विजयी घोडदौड कायम राखताना फ गटातील सामन्यात नापोलीचा 4-2 असा पराभव केला. या गटात मँचेस्टर सिटीने आपले चारही सामने जिंकून बाद फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे.

Related posts: