|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » Top News » डिजीटल व्यवहारांमध्ये 80 टक्के वाढ अपेक्षित

डिजीटल व्यवहारांमध्ये 80 टक्के वाढ अपेक्षित 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

नोटाबंदीनतंर केंद्र सरकारने डिजिटल व्यवहारांना सातत्याने चालना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाला यश येत असल्याचे दिसत आहे. आकडेवारीनुसार देशात 2017 -2018मध्ये डिजिटल व्यवहारात 80 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. डिजिटल व्यवहार 1800 कोटी रूपयांपर्यंत पेहोचण्याची अपेक्षा केली जात आहे. हा व्यवहार वाढण्यामगे नोटाबंदी हे प्रमुख कारण असल्याचे मानले जात आहे.

यावर्षी ऑक्टोबरपर्यंत एक हजार कोटीपर्यंत डिजिटल व्यवहार पोहोचला होता. अर्थिक वर्ष 2016-17मध्ये झालेल्या डिजिटल व्यवहाराइतकी ही रक्कम आहे. सुचना मंत्रालयानुसार जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 136-138 कोटी रूपयांचे डिजिटल व्यवहार झाले आहेत. मार्च – एप्रिल महिन्यात नोटाबंदीमुळे निर्माण झालेली नोटांची टंचाई हळूहळू कमी होताना दिसत आहे. तरीही डिजिटल व्यवहारात वाढ दिसून आली होती. या दोन महिन्यांत 156 कोटी रूपयांचा व्यवहार झाला होता.

Related posts: