|Saturday, March 23, 2019
You are here: Home » Top News » दिव्यांग युवक डी झोनमध्ये ; मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ

दिव्यांग युवक डी झोनमध्ये ; मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोंधळ 

नगर / प्रतिनिधी :

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राळेगणसिद्धी येथे सभा सु
रू असताना एक दिव्यांग युवक डी झोनमध्ये घुसल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा तरुण आपला अर्ज मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी पुढे आल्याची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्र्यांची राळेगणसिद्धीत आज सभा होती. या पार्श्वभूमीवर हा युवक तेथे आला होता. त्याने नोकरीसाठी अर्ज केला होता. हाच अर्ज घेवून तो डी झोनमध्ये घुसला. त्यग्नामुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी लगेच त्याला ताब्यात घेतले. या युवकाकडे अर्ज, दिव्यांग प्रमाणपत्र आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Related posts: