|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर जेली फिशचे आगमन

दक्षिण गोव्यातील किनारपट्टीवर जेली फिशचे आगमन 

प्रतिनिधी/ मडगाव

दक्षिण गोव्यातील बेतालभाटी, वेळसांव व बायणा समुद्रकिनाऱयावर जेली फिश आढळून आल्याने, समुद्र किनाऱयावर येणाऱया पर्यटकांनी व स्थानिक लोकांनी सर्तक रहावे असा इशारा समुद्र किनाऱयावर सुरक्षा पुरविणाऱया दृष्टीने दिला आहे. सद्या पावसाने विश्रांती घेतल्यानंतर जेली फिशचे आगमन झाले आहे.

जेली फिश हे विषारी असून तिच्या संपर्कात माणूस आल्यास जळजळ होते, स्नायू दुखावतात व उलटय़ा होतात, त्यामुळे समुद्रात उतरणाऱया पर्यटकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. या जेली फिशमुळे इन्फेक्शन होणाचा सुद्धा धोका असतो.

गेल्या वर्षी सुद्धा पावसाळय़ानंतर अशाच प्रकारे जेली फिशचा प्रादूर्भाव आढळून आला होता. नंतर आपसूखच जेली फिश गायब झाल्या. यंदा कालच जेली फिशचे दर्शन झाले असून ‘दृष्टी’ने सर्तकतेचा आदेश दिला आहे. जेली फिश आढळून आल्याने समुदात उतरणाऱयांना पर्यटकांना आत्ता खबरदारी घ्यावी लागणार आहे.

Related posts: