|Thursday, May 23, 2019
You are here: Home » मनोरंजन » आता घुंगरांना मिळणार सुबोधच्या ढोलकीची साथ

आता घुंगरांना मिळणार सुबोधच्या ढोलकीची साथ 

हृदयांतर, तुला कळणार नाही अशा दरमाही एका पेक्षा एक दमदार चित्रपटांतून आपले मनोरंजन करणारे आणि सध्या मराठी चित्रपटसफष्टीतील एक आघाडीचे व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जाणारे आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते सुबोध भावे आता लवकरच प्रेमला पिक्चर्स निर्मित ‘छंद प्रितीचा’ येत्या 10 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणाऱया आगामी चित्रपटात आणखीन एका नवीन भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.

महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग असलेल्या नफत्यशैलीवर आधारित छंद प्रितीचा हा आगामी सिनेमा लवकरच आपल्या भेटीस येणार आहे. तमाशातील तन मन आणि धन ओतून वावरणाऱया प्रत्येक मनस्वी कलाकाराच्या जीवनाचा वेध घेणारा हा चित्रपट… आजवर आपल्या वेगवेगळय़ा भूमिकांमधून विशेषत: चरित्रात्मक भूमिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे सुबोध भावे या चित्रपटातून राजाराम नामक एका ढोलकी वादकाच्या आगळय़ावेगळय़ा भूमिकेत आढळून येणार आहेत. कलेची गाथा सांगणाऱया या चित्रपटातून हर्ष कुलकर्णी हा नवीन अभिनेता मराठी सिनेसफष्टीत पदार्पण करत आहे. लोकगीतांचा वारसा लाभलेल्या या चित्रपटात तो एका शाहीराच्या भूमिकेत दिसणार आहे ज्याच्या शब्दांमध्ये जादू आहे. लावण्या, लोकगीतं, सवाल-जवाब, भावगीतं आणि भक्तीगीतं अशी सगळय़ाच प्रकारची काव्य लिहिणारा हा शाहीर… मराठी मुलखात आपलं नाव व्हावं या एका अपेक्षेने तो घरदार सोडून आपल्या स्वप्नपूर्तीच्या वाटेवर निघतो. या वाटेवर शाहीर सत्यवानासाठी फुलं पेरली आहेत की काटे रोवले आहेत हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

संगीत आणि सुबोध यांचं अतूट नातं आपण ह्या आधी देखील ‘कटय़ार काळजात घुसली’ या चित्रपटातून पाहिलं आहे. संगीताचा कोणताही प्रकार असो, सुबोधची त्यातील वाखाणण्याजोगी असलेली जाणं आता आपणांस पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. निर्माते चंद्रकांत जाधव यांच्या प्रेमला पिक्चर्स निर्मित छंद प्रितीचा चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केले असून छायाचित्र दिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचे आहे तर संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केले आहे.

Related posts: