|Thursday, January 17, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » पंतप्रधानांनी घेतली करूणानिधींची भेट

पंतप्रधानांनी घेतली करूणानिधींची भेट 

राजकीय चर्चेला उधाण, पत्रकार, प्रसारमाध्यमांनाही दिला सल्ला

चेन्नई / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुकचे सर्वेसर्वा नेते 94 वर्षीय एम. करुणानिधी यांची भेट घेतली आहे. ही भेट येथे करुणानिधी यांच्या निवासस्थानी सोमवारी झाल्नी. मोदी एका कार्यक्रमासाठी शहरात आले असताना त्यांनी करुणानिधींच्या निवासस्थानी जाऊन त्यांची विचारपूस केली. ही सदिच्छा भेट असल्याचे दोन्ही बाजूंकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी या भेटीमुळे राजकीय चर्चेला मात्र ऊत आला आहे.

मोदी सोमवारी सकाळी 11 वाजता येथे आले. मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर येथील एका स्थानिक वृत्तपत्राच्या 75 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात त्यांनी भाग घेतला. पत्रकारांनी त्यांची शक्ती आणि सामर्थ्य योग्य प्रकारे उपयोगात आणावे अशी सूचना त्यांनी केली.

सध्या भाजप सत्ताधारी अद्रमुकच्या संपर्कात आहे. मात्र हा पक्ष आंतर्गत वादामुळे गाजत आहे. तर करुणानिधी यांचा द्रमुक पक्ष काँग्रेससोबत आहे. तसेच द्रमुक राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा सदस्यही नाही. या पार्श्वभूभीवर ही बैठक महत्वपूर्ण मानली जात आहे. करुणानिधी हे पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांना दीर्घकालीन आजार झाला होता. आता त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठीच मोदींनी त्यांची भेट घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Related posts: